Renault ची नवी ऑफर, केवळ 1403 रुपयांच्या हप्त्यांवर रेनॉ क्विड घरी घेऊन जा

Renault कंपनीने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही Renault Kwid ही कार केवळ 1403 रुपयांच्या ईएमआयवर घरी घेऊन जाऊ शकता.

Renault ची नवी ऑफर, केवळ 1403 रुपयांच्या हप्त्यांवर रेनॉ क्विड घरी घेऊन जा

मुंबई : तुम्ही छोट्या हफ्त्यांमध्ये एखादी किफायतशीर कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर Renault कंपनीने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही Renault Kwid ही कार केवळ 1403 रुपयांच्या ईएमआयवर घरी घेऊन जाऊ शकता. (Renault new offer buy Renault Kwid for only Rs 1403 installment)

या कारची सुरुवातीची किंमत 2.99 लाख रुपये आहे, तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 5.12 लाख रुपये आहे. कंपनीने देऊ केलेल्या स्पेशल ऑफरमध्ये तुम्हाला ही कार खरेदी करायची असल्यास तुम्हाला 1,99,800 रुपये इतकं डाउन पेमेंट करावं लागेल. त्यानंतर दरमहा 1403 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

या ऑफरमध्ये तुम्हाला 1 लाख रुपयांचा फाइनॅन्स दिला जात आहे. या कर्जावरील व्याजदर 4.91 टक्के इतका आहे. 1,99,800 रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 84 महिने (सात वर्ष) 1,403 रुपयांचा ईएमआय दर महिन्याला भरावा लागेल.

जबरदस्त इंजिन

क्विडच्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 1.० लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 68 पीएसचे पॉवर आणि 91 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. इंजिन 5 स्पीड AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) गियरबॉक्ससह देण्यात आले आहे.

Renault KWID मधील फिचर्स

रेनॉच्या क्विड RXL ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये फुल व्हील कवर, इन्टर्नली अॅडजस्टेबल ORVM, एसी, इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो मिळणार आहे. तसेच यात 12V फ्रंट पॉवर सॉकेट, रेडियो आणि एमपी3 सोबत सिंगल डिन स्टीरियो, हँड्स-फ्री टेलिफोन आणि ऑडियो स्ट्रीमिंग साठी ब्लूटूथ, थिएटर डिमिंगसोबत केबिन लाइट, ट्रॅफिक असिस्टन्स मोड आणि फ्रंट स्पीकर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Renault KWID मधील सेफ्टी फिचर्स

सेफ्टीसाठी क्विड RXL AMT व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, ओवरस्पीड अलर्ट, रियर डोर चाइल्ड लॉक, हाई माउंटेड स्टॉप लॅम्प आणि सेंट्रल लॉकिंग सोबत रिमोट कीलेस एंट्री यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?

नवीन MPV Suzuki Solio Bandit लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

टोयोटाची शानदार Innova Crysta लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Renault new offer buy Renault Kwid for only Rs 1403 installment)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI