AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या सर्वात मोठ्या कार कंपनीची मोठी तयारी, पेट्रोल-सीएनजी नव्हे थेट हायड्रोजन कार आणणार

आतापर्यंत तुम्ही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी तसेच इलेक्ट्रीक कारना पाहिले असेल, मात्र आता एक प्रसिद्ध कार कंपनी हायड्रोजनवर चालणारी कार मार्केटमध्ये आणणार आहे.

भारताच्या सर्वात मोठ्या कार कंपनीची मोठी तयारी, पेट्रोल-सीएनजी नव्हे थेट हायड्रोजन कार आणणार
maruti swift
| Updated on: May 07, 2026 | 6:28 PM
Share

मारुती सुझुकीने स्विफ्टला एकदम नव्या अवतारात २०२६ च्या व्हीएना मोटर सिम्पॉझियममध्ये प्रदर्शित केली आहे. आधीच्या कार धावल्यानंतर धूर सोडायच्या, आता ही स्विफ्ट कार धावल्यानंतर पाणी निघते. हो आपण बोलत आहोत स्विफ्ट हायड्रोजन कारबद्दल…आतापर्यत सुझुकी स्विफ्टचा पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अवतार भारताने पाहिला आहे. आता स्विफ्टचा लवकरच हायड्रोजन अवतार येणार आहे. या हायड्रोजन कारची काय आहेत नेमकी वैशिष्ट्ये हे पाहूयात…

मारुती सुझुकी स्विफ्ट भारतीय बाजारातील सर्वात प्रसिद्ध कारपैकी एक आहे. भारतच नाही तर जगाच्या अनेक देशातही स्विफ्टला पसंद केले जाते. ग्लोबल मार्केटमध्ये ही कार मल्टीपल पॉवरट्रेनमध्ये मिळते. वेगवेगळ्या बाजारात ही कार पेट्रोल, टर्बो पेट्रोल, डिझेल, माईल्ड हायब्रिड आणि सीएनजी व्हेरिएंट्समध्ये ही कार मिळते.

आता ही कार एका नव्या प्रकारच्या फ्युअल ऑप्शनमध्ये मिळू शकते. कंपनीने या कारचे हायड्रोजन इंजिनवाल्या व्हेरिएंटमध्ये दाखवले आहे. या कारला व्हीएन्ना मोटर सिम्पोझियम २०२६ मध्ये प्रदर्शित केले आहे. हायड्रोजन कार  भारताला नवी नाही.

कशी काम करते ही हायड्रोजन कार ?

या कारममध्ये हायड्रोजन फ्युएल सेल्सचा वापर हायड्रोजनपासून वीज निर्मितीसाठी केला जातो.हे हायड्रोजन कारच्या टँकमध्ये स्टोअर असते. या वीजेच्या मदतीने बॅटरीला चार्ज केले जाते, त्यामुळे कारमधील इलेक्ट्रीक मोटर्सना पॉवर मिळते. या प्रकाराने ही हायड्रोजन कार रस्त्यावर धावते. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ पाणी बाहेर पडते. म्हणजे प्रदुषणाचा काही त्रास नाही.

मात्र, सध्या हे तंत्रज्ञान प्रगत होत आहे. यात हायड्रोजनचा वापर थेट फ्युअल म्हणून केला जातो. म्हणजे यात विज निर्मिती करण्याची काही गरज नाही. मोबिलिटी टेक्नॉलॉजी कंपनी एव्हीएल आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने हायड्रोजन इंजिनात काही यश मिळवले आहे.

कंपनी या कारला २०२६ व्हिएन्ना मोटर सिम्पोझियममध्ये दाखवले गेलेआहे. या टेक्नॉलॉजीला एक सुझुकी स्विफ्टमध्ये दाखवले जाणार आहे. ही कार एका प्रोटोटाईप हायड्रोजन इंजिनावर चालणार आहे. यास कंपनीने हायड्रोजन डीआय टेक्नॉलॉजी म्हणत आहे. एव्हीएलचा सिस्टीम सुझुकीसाठी १.४ लिटर फोर सिलिंडर हायड्रोजन इंजिनावर लावण्यात आले आहे.

सध्या भारतात काय स्थिती ?

सध्या भारतात हायड्रोजन कार विकल्या जात नाहीत. मात्र, भविष्यात ऑटो सेक्टर कोणत्या दिशेने जाईल हे सांगू शकत नाही. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारताने ग्रीन फ्युअल आणि कार्बन फुटप्रिंट कमी करण्यावर जोर दिला आहे. सध्या भारतात इलेक्ट्रीक आणि हायब्रिड कारला प्रोत्साहन दिले जात आहे.

यासोबतच इथेनॉल ब्लेंडिंगला देखील वाढवण्यावर विचार केला जात आहे. अशात हायड्रोजन एक चांगला आणि व्यवहारी पर्याय बनू शकतो. सध्या कोच्चि एअरपोर्टने एक हायड्रोजन स्टेशन सेटअप केले आहे. या स्टेशनला एअरपोर्टवर चालणाऱ्या हायड्रोजन बस आणि इतर व्हेइकलसाठी लावण्यात आले आहे.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल