AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या सोसायट्यांमध्येच Electric Car चार्ज करा, MG Motor इलेक्ट्रिक चार्जर्स इन्स्टॉल करणार

एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनी डिसेंबर 2019 मध्ये पहिली कार लाँच केल्यापासून चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर (Charging Infrastructure) उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे.

तुमच्या सोसायट्यांमध्येच Electric Car चार्ज करा, MG Motor इलेक्ट्रिक चार्जर्स इन्स्टॉल करणार
MG Motor India - MG Charge
| Updated on: Mar 04, 2022 | 11:06 PM
Share

मुंबई : एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनी डिसेंबर 2019 मध्ये पहिली कार लाँच केल्यापासून चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर (Charging Infrastructure) उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासोबत ग्राहकांना सोईस्कर चार्जिंग पायाभूत सुविधा देण्याप्रती असलेले मिशन सुरू ठेवत एमजी मोटर इंडियाने आज नवीन उद्यम ‘एमजी चार्ज’च्या (MG Charge) लाँचची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत एमजी भारतभराततील निवासी ठिकाणी 1000 एसी फास्ट चार्जर्स इन्स्टॉल करेल आणि असे करणारा भारतातील ओईएमचा हा पहिलाच उपक्रम आहे. हे स्मार्ट चार्जर्स टाइप 2 चार्जर्स असतील, जे आघाडीच्या विद्यमान व भावी ईव्हींना सपोर्ट करतील. तसेच हे चार्जर्स सिम-सक्षम असतील आणि त्‍यांना शेअरेबल चार्जर मॅनेजमेंट सिस्टिमच्या माध्यमातून सपोर्ट असेल.

कनेक्टेड एसी चार्जिंग स्टेशन्स या सोसायटींमधील निवासी व अभ्यागतांच्या ईव्ही चार्जिंग गरजांची 24 X 7 तास पूर्तता करतील. यामुळे सोसायटींना भविष्यासाठी सुसज्ज, हरित बनवण्यास मदत होईल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याप्रती प्रोत्साहन मिळेल. कार्बन उत्सर्जन कमी करत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी योगदान देण्याप्रती एक जागरूक पाऊल देखील आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्‍हणाले, “एमजी भारतातील ईव्ही परिसंस्था वाढवण्याच्या आपल्या मिशनच्या दिशेने सतत काम करत आहे. एमजी चार्जच्या लाँचसह आम्ही सोयीसुविधांमध्ये वाढ करणार आहोत आणि ग्राहकांच्या चार्जिंगसंदर्भातील समस्यांचे निराकरण करणार आहोत. तसेच आम्ही ईव्ही जीवनशैली अवलंबण्यास अधिकाधिक ग्राहकांना प्रोत्साहित करत आहोत. या उपक्रमासह आता ग्राहकांना आमचे ६-मार्गी चार्जिंग सोल्यूशन मिळेल आणि त्यांना अधिक साह्य व विश्वास देण्यात येईल.”

एमजी हा उपक्रम राबवण्यासाठी इलेक्ट्रीफाय (एमजी डेव्‍हलपर प्रोग्राम व ग्राण्ट 20 विजेता), एक्झिकॉम, ईचार्जबेज, रेसिडण्ट वेल्फेअर असोसिएशन्स आणि इतर नवीन भागीदारांसोबत सहयोग करेल.

कम्युनिटी चार्जर पायाभूत सुविधांना चालना

आपले भागीदार आणि इतर आरडब्ल्यूएसोबत एमजी भविष्यात कम्युनिटी चार्जर पायाभूत सुविधांना चालना देणे सुरूच ठेवेल. असे करत कार उत्पादक कंपनीचा ईव्ही अवलंबतेला चालना देण्याकरिता विविध निवासी ठिकाणी एकसंधी व सोईस्कर वेईकल चार्जिंग अनुभव देण्याचा मनसुबा आहे. एमजी आरडब्ल्यूएसोबत सहयोग करेल आणि इन्स्टॉलेशन प्रक्रियेसाठी एण्ड-टू-एण्ड मार्गदर्शन, समन्वयन व पाठिंबा देण्यासोबत निवडक निवासी सोसायटींसाठी खर्चांमध्ये बचत करण्याची सुविधा देईल.

सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन्स

एमजी हरित गतीशीलतेप्रती जागरूक पाऊल उचलत आहे आणि भारतातील ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा प्रबळ करत आहे. कंपनीने सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन्स सादर करण्यासाठी नुकतेच फोर्टम व टाटा पॉवरसोबत सहयोग केला आहे. याव्यतिरिक्त एमजी झेडएस ईव्ही मोफत एसी फास्ट-चार्जर (ग्राहकाच्या घरी/ कार्यालयामध्ये इन्स्टॉल करता येते), प्लग-अॅण्ड–चार्ज केबल ऑनबोर्ड आणि चार्ज-ऑन-दि-गो सह आरएसए (रोडसाइड असिस्ट) सोबत येते.

इतर बातम्या

Rohit Sharma New Car: रोहित शर्माने खरेदी केली भारताच्या जर्सीला साजेशी आलिशान कार, किंमत मुंबईतल्या 3BHK फ्लॅटएवढी

घरबसल्या शोरूममधून कार खरेदीचा अनुभव घ्या, MG Motor चा ‘एमजी एक्स्पर्ट’ प्लॅटफॉर्म लाँच

बहुप्रतीक्षित Skoda Slavia भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.