पॅरालिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या भाविना पटेलला MG Motor स्पेशली कस्टमाइज्ड SUV भेट देणार

टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

पॅरालिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या भाविना पटेलला MG Motor स्पेशली कस्टमाइज्ड SUV भेट देणार
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 5:14 PM

मुंबई : टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. स्त्रियांची ताकद आणि दृढनिश्चयाची दखल घेत ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर इंडियाने भाविना पटेलच्या ऐतिहासिक कामगिरीला सलाम केला आहे. एमजी मोटर इंडिया स्पेशली कस्टमाइज्ड एमजी एसयूव्ही भेट देऊन चमकदार कामगिरीबद्दल भाविनाचा सन्मान करणार आहे. (MG Motor to honour Paralympics silver medalist Bhavina Patel, will gift Astor SUV)

भाविनाच्या या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन करताना एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी ट्विट केले की, “विजयी पताका घेऊन परतणाऱ्या भाविनाबेनला एमजी कार भेट देणे हा आमचा सन्मान आणि बहुमान असेल.”

भारतात प्रवेश केल्यापासून आणि हलोल येथे आपलं उत्पादन सुरू केल्यापासून एमजी मोटर वडोदरा मॅरेथॉनचे प्रायोजक आहे. वडोदरा मॅरेथॉन इतर मॅरेथॉनपेक्षा वेगळी आहे, कारण ती नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते, ज्यात ‘दिव्यांग रन’ नावाच्या शर्यतीचा सहभाग आहे.

एमजी मोटरने पॅरालिम्पिक ॲथलीट आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. दीपा मलिक यांच्या आवाजाने आपल्या वैयक्तिक एआय सहाय्यकाला देण्याची घोषणा केली आहे. हा प्रयत्न एमजी ब्रँडचे उत्साही आणि आगामी एसयूव्ही अॅस्टरच्या संभाव्य मालकांना अनोखा अनुभव देईल.

ऑटोमोटिव्ह ब्रँड असल्याने एमजीने केवळ ऑटोमोटिव्ह क्षेत्रावरच लक्ष केंद्रित केले नाही तर समाजातील महत्त्वाच्या घटकांच्या सक्षमीकरणासाठी सक्रियपणे काम केले आहे.

गुजरात सरकारकडून बक्षिसाची घोषणा

गुजरात सरकार त्यांची स्टार टेबल टेनिसपटू भाविनाचा सन्मान करण्याची कोणतीच संधी सोडू इच्छित नाही. ती भारतात परतण्यापूर्वीच सरकारने बक्षिसाची घोषणा केली आहे. सरकारने भाविनाला तब्बल तीन कोटी रुपयांच रोख बक्षिस जाहीर केलं आहे. तसंच भाविनाला सरकारी नोकरी देण्याची घोषणाही केली आहे. भाविनाने तिच्या आयुष्यात पैशासह नोकरीसाठी फार संघर्ष केला आहे. पण आता हा संघर्ष संपला असून भाविनाच्या घरचेही खूप आनंदी झाले आहेत. दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीही भाविनाला पदक जिकल्यानंतर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले,‘भाविनाबेनने टोक्यो 2020 पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन.  गुजरात सरकार भाविनाला बक्षिस म्हणून तीन कोटी रुपये देणार आहे.’

कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना

भाविना पटेलने रौप्य पदक जिंकताच तिच्या घरातल्यांनी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब गरबा करुन आनंद व्यक्त करत आहे. तर संपूर्ण परिसरात मिठाई देखील वाटली जात आहे. भाविनाचे कुटुंबिय गरबा खेळत असलेला व्हिडीओ ANI या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.

(MG Motor to honour Paralympics silver medalist Bhavina Patel, will gift Astor SUV)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.