Anant Ambani Luxurious Cars : अनंत अंबानी चालवितात इतक्या कोटींची कार, लक्झरी कारचे आहे दमदार कलेक्शन

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Jan 21, 2023 | 10:18 PM

Anant Ambani Luxurious Cars : अनंत अंबानी यांच्या ताफ्यात कोट्यवधींच्या कार आहेत, या कार कोणत्या आहेत.

Anant Ambani Luxurious Cars : अनंत अंबानी चालवितात इतक्या कोटींची कार, लक्झरी कारचे आहे दमदार कलेक्शन

नवी दिल्ली : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या ताफ्यात कोट्यवधींच्या कार आहेत. अनंत अंबानी यांचा त्यांची बालमैत्रिण राधिका मर्चेंट (Radhika Merchant) हिच्याशीसोबत 19 जानेवारी रोजी साखरपुडा झाला. अनंत हे कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे वारसदार आहेत. अनंत यांच्याकडे रॉल्स रॉयस पासून ते बीएमडब्ल्यू, मर्सिडीज सह अन्य अनेक कंपन्यांच्या महागड्या कार आहेत. त्यांच्या ताफ्यातील या आलिशान कारविषयी (Anant Ambani Car Collection) जाणून घेऊयात.

अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा आणि लाडका मुलगा आहे. ते आलिशान जीवनशैलीसोबत विनम्रतेने आणि साधेपणाने आयुष्य जगत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यांचे पाय जमिनीवर असल्याचे अनेक वेळा दिसले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखरपुडा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या आलिशान निवासस्थानी झाला. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी आणि प्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली. राधिका मर्चेंट अनंत अंबानी यांची लहानपणीची मैत्रिण आहे.

अनंत अंबानी यांच्या ताफ्यात सुपर लक्झरी कार रॉल्स रॉयस फॅंटमचा समावेश आहे. तिची किंमत 9 कोटी रुपयांहून अधिक आहे. ही कार जगातील श्रीमंत व्यक्तींच्या ताफ्याची शान वाढवितात.

19 जानेवारी 2023 रोजी अनंत अंबानी यांनी राधिका मर्चेट सोबत साखरपुडा केला. अनंत अंबानीकडे बीएमडब्ल्यू कंपनीची सुपरकार बीएमडब्ल्यू आय8 पण आहे. या कारची किंमत अडीच कोटी रुपयांहून अधिक आहे.

अनंत अंबानी यांच्या ताफ्यात ज्या लक्झरियस कार आहेत. त्यात मर्सिडीजची शक्तीशाली एसयुव्ही मर्सिडीज बेंज जी 63 एएमजीचा समावेश आहे. या कारची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये आहे.

अनंत अंबानी यांच्या आलिशान कारच्या ताफ्यात पॉवरफुल एसयुव्ही रेंज रोवर वॉगचा पण सहभाग आहे. या कारची किंमत 2.3 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे आलिशान कार सेडान मर्सिडीज बेंज एस-क्लासचा पण सहभाग आहे. या कारची किंत दीड कोटी आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI