AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki : मारुतीकडून नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीची चाचपणी… सिंगल चार्जवर मिळणार 500 किमीची रेंज…

मारुतीच्या नवीन इलेक्ट्रिक एसयुव्ही कारच्या 2WD व्हेरिएंटची रेंज जवळपास 400 किमी असण्याची शक्यता आहे.दुसरीकडे 4WD व्हेरिएंटमध्ये 170 bhp मोटर आणि 59 kWh चे मोठे बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे.एक वेळा चार्ज केल्याने यातून 500 km ची रेंज मिळते.

Maruti Suzuki : मारुतीकडून नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीची चाचपणी... सिंगल चार्जवर मिळणार 500 किमीची रेंज...
मारुतीकडून नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीची चाचपणीImage Credit source: social
| Updated on: Jul 13, 2022 | 12:10 PM
Share

मुंबई : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली एक नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीवर काम करीत आहे. एका रिपोर्टनुसार, ही कंपनीची पाहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही (New electric SUV) ठरणार असून तिला 2024 पर्यंत लाँच केले जाणार असल्याचा अंदाज आहे. मारुती या गाडीचे प्रोडक्शन जपानी बेस्ड टीमसोबत करणार आहे. अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीची निसान लीफ आणि Peugeot e2009 EV यांच्याशी स्पर्धा होणार आहे. दरम्यान, अद्याप कंपनीकडून या सर्व माहितीबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु मारुतीने रिक्वेस्ट फॉर कोटेशन (RFQs) रिलीज केले होते. या आधारावर अपकमिंग इलेक्ट्रिक कारशी निगडीत काही माहिती समोर आली आहे. मारुतीच्या अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्ही कारबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीची पॉवर

अपकमिंग एसयुव्हीची लांबी जवळपास 4.2 मीटर असणार आहे. तर व्हीलबेस जवळपास 2700 मिमी असण्याची अपेक्षा आहे. या शिवाय मारुती टोयोटाच्या ग्लोबल 40PL प्लेटफॉर्मचा वापर यात होण्याची शक्यत असून त्यात स्केटबोर्ड आर्किटेक्चर मिळणार आहे. रिपोर्टनुसार, नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये 2WD आणि 4WD हे दोन ड्राइवट्रेन पर्याय उपलब्ध असणार आहे. एसयुव्हीच्या 2WD व्हेरिएंटमध्ये 48 kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता असून त्यातून 138 bhp मोटर पावर जनरेट होणार आहे.

सिंगल चार्जवर 400 किमी रेंज

मारुतीची ही नवीन इलेक्ट्रिक एसयुव्ही कारच्या 2WD व्हेरिएंटची रेंज जवळपास 400 किमी असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे 4WD व्हेरिएंटमध्ये 170 bhp मोटर आणि 59 kWh चे मोठे बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. एक वेळा चार्ज केल्याने यातून 500 km ची रेंज मिळते. Gaadiwaa,di नुसार, अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये तोशिबा डेंसो सुझुकी गुजरातच्या बॅटरी पॅकचा वापर करण्यात आलेला आहे.

किती आहे किंमत?

नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीच्या बेस मॉडेल म्हणजेच 2WD व्हेरिएंटची एक्सशोरुम किंमत 13-15 लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. मारुती सध्या ग्रँड विटारा हायब्रिउ लाँच करण्यावर काम करीत असून या कारला याच महिन्यात लाँच केले जाण्याची शक्यता आहे. ग्रेड विटारा हायब्रिउ कंपनीच्या लाइनअपमधील पहिली हायब्रिड एसयुव्ही असणार आहे. या कारची स्पर्धा एसयुव्ही ह्युंदाई क्रेटा आणि किया सेल्टोस सोबत असणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.