AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वस्तात TVS Apache खरेदीची संधी, 10 हजारांच्या डिस्काऊंटसह घरबसल्या स्पोर्ट्सबाईक खरेदी करा

तुम्ही स्वत: साठी चांगली बाईक शोधत असाल तर 10,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत लोकप्रिय स्पोर्ट बाइक Apache RTR 200 खरेदी करण्याची एक उत्तम संधी तुम्हाला मिळत आहे.

स्वस्तात TVS Apache खरेदीची संधी, 10 हजारांच्या डिस्काऊंटसह घरबसल्या स्पोर्ट्सबाईक खरेदी करा
TVS Apache
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 15, 2021 | 3:48 PM
Share

मुंबई : तुम्ही स्वत: साठी चांगली बाईक शोधत असाल तर 10,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत लोकप्रिय स्पोर्ट बाइक Apache RTR 200 खरेदी करण्याची एक उत्तम संधी तुम्हाला मिळत आहे. यात टीव्हीएस मोटर्सकडून (TVS Motors) ऑनलाइन बुकिंगवर 5 टक्क्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 5000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देण्यात येत आहे. याशिवाय फायनान्स स्कीम अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे. (perfect time to buy TVS Apache RTR 200 sportbike with discount up to 10000 rs)

TVS Apache RTR 200 बाईकची एक्स शोरूम किंमत 1.29 लाख रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी कंपनीने या बाईकचे BS-6 मॉडल लाँच केले होते. या सेगमेंट मध्ये ही एकमेव अशी बाइक आहे. ज्यात मल्टिपल रायडिंग मोड्स सोबत अॅडजस्टेबल सस्पेंशन मिळते. यामध्ये BS6 कम्पलायंट 197.75cc क्षमतेचं ऑयल-कूल्ड फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. जे 20.54bhp दमदार पॉवर आणि 17.25Nm टॉर्क जनरेट करतं.

डबल-क्रॅडल स्पलिटी फ्रेमवर बेस्ड असलेली ही बाइक तिच्या दमदार परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे. या बाईकचं इंजिन 5 स्पीड गियरबॉक्ससह येतं. TVS Apache RTR 200 4V BS6 मध्ये ग्लाइड थ्रू टेक्नोलॉजी (जीटीटी प्लस) एलईडी हेडलॅम्प, स्लिपर क्लच, ब्लूटूथ इनेबल्ड स्मार्टकनेक्ट सिस्टम आणि रियर रेडियल टायर देण्यात आले आहेत.

इतर फीचर्स

या बाईकच्या इतक फिचर्सविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आलं आहे. ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचं तर याच्या फ्रंटला 270mm सिंगल वेवी डिस्क ब्रेक आणि रियर व्हीलमध्ये 240mm डिस्क ब्रेक आहे. ही बाईक सिंगल चॅनेल आणि ड्युअल चॅनल एबीएससह सादर करण्यात आली आहे.

इतर बातम्या

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(perfect time to buy TVS Apache RTR 200 sportbike with discount up to 10000 rs)

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...