पेट्रोल-डिझेल, हायब्रिड, सीएनजी की इलेक्ट्रिक ? जाणून घ्या कोणती कार आहे बेस्ट

भारतामध्ये पेट्रोल-डिझेल कारशिवाय सीएनजी कारही खूप लोकप्रिय आहेत. त्याच वेळी, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कार देखील हळूहळू बाजारपेठेत स्थान मिळवत आहेत.

पेट्रोल-डिझेल, हायब्रिड, सीएनजी की इलेक्ट्रिक ? जाणून घ्या कोणती कार आहे बेस्ट
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 10:33 AM

नवी दिल्ली : आजकाल कार्समध्ये (cars) पॉवरट्रेनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजी (cng cars) गाड्यांनी आपली क्षमता दाखवली आणि आता हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कारसारखेही (electronic cars) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आधीपासून इंधनावर चालणाऱ्या कारपेक्षा हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कार या पर्यावरणासाठी खूप चांगल्या आहेत. तथापि, अनेक बाजारपेठांमध्ये अनेक पर्याय (many options in market) उपलब्ध असल्याने, ग्राहकांनी पेट्रोल-डिझेल, सीएनजी, हायब्रीड की इलेक्ट्रिक यापैकी कोणती कार घ्यायची हे ठरवणे कठीण होते.

तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि अनेक पर्यायांमुळे गोंधळून गेला असाल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला या सर्व पॉवरट्रेन पर्यायांबद्दल बरंच काही सांगणार आहोत. तुमच्यासाठी कोणती कार अधिक चांगली आहे हे ठरवण्यात यामुळे तुम्हाला मदत होईल.

Petrol-Diesel Cars : परफॉर्मन्स उत्तम

हे सुद्धा वाचा

ज्या लोकांना जुन्या पद्धतीचा परफॉर्मन्स आवडतो ते पेट्रोल-डिझेल कार घेऊ शकतात. कामगिरीच्या बाबतीत पेट्रोल कार अधिक चांगल्या मानल्या जातात. त्यांची पॉवर डिलिव्हरी खूप चांगली आहे. पण जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी ही पेट्रोल कार चालवणे महाग ठरू शकते.

डिझेल कारबद्दल बोलायचे झाले तर त्यांची ट्रॅक्टेबिलिटी अधिक चांगली आहे. त्याच वेळी, या कार इंधन कार्यक्षमतेच्या बाबतीत देखील चांगल्या आहेत. जर तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड असेल तर या कार्स उत्तम मायलेज देतात. याशिवाय डिझेल कारमध्ये पेट्रोलपेक्षा जास्त टॉर्क पॉवर मिळेल. Mahindra XUV700, Kia Seltos, Toyota Fortuner इत्यादी काही लोकप्रिय पेट्रोल-डिझेल मॉडेल्स आहेत.

CNG/LPG Cars : चालवण्यासाठी कमी खर्चिक

तुम्ही शहरात ये-जा करण्यासाठी कार खरेदी करत असाल, तर सीएनजी किंवा एलपीजीचा पर्याय अधिक चांगला ठरू शकतो. पेट्रोलसोबत सीएनजीचा पर्याय तुम्हाला उत्तम मायलेज देतो. जरी, त्यांच्याकडे कार्यक्षमता आणि शक्ती कमी असली, परंतु त्या कार चालविण्यासाठी कमी खर्चिक आहेत. सीएनजी कार खरेदी करताना, तुमच्या शहरात किंवा परिसरात सीएनजी पंप उपलब्ध असल्याची खात्री करा आणि मगच कार विकत घ्या. मारुती सुझुकी स्विफ्ट S-CNG, Hyundai Aura CNG, Tata Tigor iCNG सारखी लोकप्रिय मॉडेल्स CNG मध्ये येतात.

Hybrid Cars : पेट्रोल आणि इलेक्ट्रिक यांचे मिश्रण

हायब्रीड कारचे तंत्रज्ञान स्वतःच खूप वेगळे आहे. जर कोणाला पेट्रोल कार सारखी कामगिरी पण मायलेज जास्त हवे असेल तर ते हायब्रीड कार घेऊ शकतात. या कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पेट्रोल व्यतिरिक्त, तुम्ही त्यांना इलेक्ट्रिक मोडमध्ये देखील चालवू शकता. हायब्रीड कार्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये Honda City e:HEV, Toyota Camry, Toyota Urban Cruiser Hyryder, Maruti Grand Vitara सारख्या कारचा समावेश आहे.

Electric Cars: मेंटेनन्सचा खर्च होईल कमी

इलेक्ट्रिक कार बॅटरी पॅकच्या पॉवरवर चालतात. ते चालवून तुमच्या खिशावरचा बोजा कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल गाड्यांप्रमाणे त्याची वारंवार देखभाल करण्याची गरज नाही. मात्र, या गाड्या खूप महाग आहेत. इलेक्ट्रिक कार खरेदी करताना, हे देखील लक्षात ठेवा की सध्या इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी पायाभूत सुविधा इतकी मजबूत नाही, त्यामुळे तुम्ही सर्व ठिकाणी कार चार्ज करू शकालच असे नाही. बाजारात Tata Nexon EV, MG ZS EV, Hyundai Kona EV असे अनेक EV पर्याय उपलब्ध आहेत.

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.