AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीला ही सात आसनी कार पावली, विक्रीत थेट 108% ची उसळी

Renault कंपनीने FY2026 च्या सुरुवातीलाच 108% विक्रीची वाढ केली आहे. ज्यात Renault Duster ला प्रचंड मागणी आहे. कंपनी डस्टरचे हायब्रिड मॉडेल दिवाळीपर्यंत लाँच करु शकते. तर सात आसनी व्हर्जन साल 2027 पर्यंत येण्याची आशा आहे.

कंपनीला ही सात आसनी कार पावली, विक्रीत थेट 108% ची उसळी
Renault Duster
| Updated on: May 03, 2026 | 6:50 PM
Share

Renault इंडियाने FY2026 ची सुरुवात मोठ्या शानदार पद्धतीने केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये कंपनीच्या कारची विक्री १०८ टक्के वाढली. गेल्या महिन्यात कंपनीने ५,४१३ कार विकल्या, तर गेल्यावर्षी एप्रिल २०२५ मध्ये हा आकडा २,६०२ युनिट्स इतका होता. नव्या जनरेशनची Renault Triber आणि Renault Kiger च्या लाँचनंतर ( सप्टेंबर २०२५ ) कंपनीने सातत्याने चांगली ग्रोथ ठेवली आहे.

नव्या Renault Duster ला ग्राहकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. एप्रिलच्या दुसऱ्या भागात डिलिव्हरी सुरु होताच पहिल्याच आठवड्यात हीची मागणी वेगाने वाढली आहे. ज्यामुळे हे स्पष्ट होतेय की ही सुव्ह लोकांना खूप पसंद येत आहे.

रेनॉल्ट डस्टर हायब्रिड केव्हापर्यंत होणार लॉन्च

रेनॉल्ट इंडिया कंपनी दिवाली २०२६ पर्यंत डस्टर हायब्रिड लाँच करण्याच्या तयारीत आहे. या यसयूव्हीमध्ये १.८ लिटरचे चार सिलिंडरचे पेट्रोल इंजिन लागणार आहे. ज्याच्या सोबत दोन इलेक्ट्रीक मोटर आणि १.४ किलोवॅट – तासांचा बॅटरी पॅक दिला जाणार आहे. याची पॉवर आणि टॉर्क जवळपास १६० बीएचपी आणि १७२ एनएम असणार आहे. रेनॉल्ट डस्टर हायब्रिड, मारुती ग्रँड व्हीटारा आणि टोयोटा हायब्रिडरच्या हायब्रिड व्हेरिएंटपेक्षा जास्त पॉवरफुल असणार आहे.

डस्टरच्या सीएनजी व्हेरिएंटवर विचार सुरु

मात्र हीच्या किंमतीच्या अधिकृत घोषणा येणाऱ्या महिन्यात केली जाणार आहे. परंतू डस्टर हायब्रिटच्या २०२६ मॉडेलचे सर्व युनिट्स आधीच विकले गेले आहेत आणि बुकींग सध्या बंद आहे. वाहन निर्माता कंपनी बाजारातील मागणीच्या आधारे डस्टरच्या सीएनजी व्हेरिएंटवर देखील विचार करत आहे.

रेनॉल्ट डस्टर ७-सीटर

फ्रान्सची असलेली ही वाहन निर्मिती कंपनी २०२७ मध्ये डस्टरचे तीन – रॉवाला व्हेरिएंट देखील लाँच करण्याची योजना आखत आहे. हे मॉडेल आपल्या पाच आसनी मॉडेलसोबत प्लॅटफॉर्म, इंजिन, डिझाईन आणि अन्य फिचर्स शेअर करेल. याशिवाय हीच्या स्टायलिंगमध्ये गेल्या वर्षी लाँच केलेल्या रेनॉल्ट बोरेलकडूनही देखील काही संकेत घेतले जाऊ शकतील असे म्हटले जात आहे.

सात आसनी डस्टरचा एकूण आकार बोरेलच्या सारखाच असण्याची आशा आहे. बोरेलची लांबी ४,५५६ मिमी, रुंदी १,८४१ मिमी आणि उंची १,६५० मिमी आहे. लाँच झाल्यानंतर ७ – आसनी रेनॉल्ट डस्टरची स्पर्धा महिंद्रा एक्सयुव्ही ७ एक्सओ, टाटा सफारी, हुंडई अल्काझार आणि आगामी ७ आसनी मारुती ग्रँड व्हीटारा आणि टोयोटा हायरायडरशी होईल.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?