Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी

| Updated on: Mar 04, 2021 | 9:47 AM

रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) गेल्या महिन्यात (15 फेब्रुवारी) भारतात लाँच केली होती.

Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी
Renault Kiger
Follow us on

मुंबई : रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) गेल्या महिन्यात (15 फेब्रुवारी) भारतात लाँच केली होती. काही दिवसांपासून या कारसाठी बुकिंग सुरु करण्यात आलं होतं. आजपासून या कारची डिलीव्हरी सुरु झाली आहे. दरम्यान, या कारने आज एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. कंपनीने म्हटलं आहे की, आज डिलीव्हरीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी Renault Kiger च्या तब्बल 1100 युनिट्सची डिलिव्हरी केली आहे. नवीन रेनॉ कायगरची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरु होते. तर या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 9.55 लाख रुपये इतकी आहे. (Renault Kiger strong start in Indian Market, 1100 units delivered on opening day sales)

रेनॉ कायगरमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 99 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क निर्माण करु शकतं. सोबतच 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन स्टँडर्डची सुविधा असेल. AMT सह सीवीटी ट्रांसमिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. रेनॉ कायगरमध्ये मल्टीसेंस ड्राइव्ह मोड फीचर देण्यात आलं आहे. ही कार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोडवर चालवता येईल.

Renault Kiger ही कार कंपनीने एकूण 4 वेरिएंटमध्ये सादर केली आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ मॉडलचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला रेनॉ कायगरच्या सर्व वेरियंट्सच्या किंमतीबाबतची माहिती देणार आहोत. जेणेकरुन त्यापैकी कोणतं वेरियंट तुमच्यासाठी बेस्ट आहे, हे तुम्ही ठरवू शकाल. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कारची निवड करु शकाल.

Kiger चे वेरिएंट्स RXE RXL RXT RXZ
Energy MT 5.45 लाख रुपये 6.14 लाख रुपये 6.60 लाख रुपये 7.55 लाख रुपये
Easy-R AMT 6.59 लाख रुपये 7.05 लाख रुपये 8.00 लाख रुपये
Turbo MT 7.14 लाख रुपये 7.60 लाख रुपये 8.55 लाख रुपये
X-Tronic CVT 8.60 लाख रुपये 9.55 लाख रुपये

बेस्ट एसयूव्ही?

या गाडीमधील इंस्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे. थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील, 8 स्पीकर साउंड सिस्टम, फ्लोटिंग टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग पॅड, सिलेक्टिव ड्राइव्ह मोड, प्रीमियम क्वालिटी सीट्स, प्लास्टिक कवर्ड दरवाजे, फिलिप्स एयर प्यूरीफायर, रियर एसी वेंट्स, 405 लीटर बूट स्पेससारख्या अनेक फीचर्समुळे ही कार बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. त्यामुळेच जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची कंपनी Renault ने आज कायगर (Kiger) ही एसयूव्ही बाजारात सादर केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.45 लाख रुपये आहे. याआधी Nissan कंपनीची Magnite ही एसयूव्ही नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault ची Kiger सर्वात स्वस्त एसयूव्ही ठरू शकते.

Renault Kiger चं कसं आहे डिझाइन?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kiger ही भारतात तयार होणारं जागतिक उत्पादन असणार आहे. नवीन रेनॉ कायगर ही कार किया सोनेट, ह्युंदाई वेन्यू, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा केयूव्ही 300 आणि इतर कार्ससाठी तगडा स्पर्धक असणार आहे.

या गाड्यांना टक्कर देणार

भारतीय बाजारात Kiger ची टक्कर ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite), किआ सोनेट (Kia Sonet), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300) आणि मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) या गाड्यांशी होणार आहे.

इतर बातम्या

बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी बॅटरी बसवण्याला प्राधान्य, खर्च किती?

दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या ‘या’ तीन 300cc बाईक्सपैकी कोणती बाईक आहे तुमच्यासाठी बेस्ट?

निसानच्या ‘या’ कारला भारतात तुफान मागणी, विक्रीच्या बाबतीत फेब्रुवारीत नवा रेकॉर्ड

(Renault Kiger strong start in Indian Market, 1100 units delivered on opening day sales)