Royal Enfield खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण! Royal Enfield आणणार कमी बजेटमध्ये बाईक; किंमत ऐकून व्हाल थक्क

Royal Enfield Affordable Bikes: महागड्या Royal Enfield ला पर्याय मिळणार आहे. कमी किमतीत दमदार बाईक आणण्याच्या तयारीत कंपनी आहे.

Royal Enfield खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण! Royal Enfield आणणार कमी बजेटमध्ये बाईक; किंमत ऐकून व्हाल थक्क
Royal Enfield
| Updated on: Nov 22, 2026 | 11:53 PM

रॉयल एनफील्ड बाईक खरेदी करणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. परंतु जास्त किंमतीमुळे प्रत्येकाला ती खरेदी करणे शक्य होत नाही. विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना पहिल्यांदाच आपली नेहमीची बाईक सोडून रॉयल एनफील्ड खरेदी करायची आहे. आता अशा ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने हिमालयन 450, गुरिल्ला 450 आणि 650 सीसी सारख्या शक्तिशाली बाईक्सवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

पण आता रॉयल एनफील्ड कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठीही नवीन पर्याय तयार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी 250 सीसी इंजिन असलेल्या परवडणाऱ्या बाईक्स लॉन्च करण्याची योजना आखत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल एनफिल्डच्या नवीन 250 सीसी बाईक्स 2027-28 या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत बाजारात येऊ शकतात. मात्र कंपनीने अद्याप लॉन्चच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Loading...

विशेष म्हणजे, केवळ एक नवीन बाईक सादर करण्याऐवजी रॉयल एनफिल्ड एक संपूर्ण 250 सीसी प्लॅटफॉर्म विकसित करू शकते. यामुळे कंपनीला विविध डिझाइन आणि किंमतींच्या अनेक प्रकारच्या मोटरसायकल तयार करता येतील. या प्लॅटफॉर्मला अंतर्गतरीत्या “V” असे नाव देण्यात आले आहे. चीनी बाईक उत्पादक सीएफमोटोसोबत तांत्रिक भागीदारीचीही चर्चा आहे. यापैकी कोणत्याही घडामोडीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

रॉयल एनफिल्डच्या नवीन 250 सीसी बाईक्सबद्दल सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे त्यांचे इंजिन आणि मायलेज. काही अहवालानुसार, कंपनी यामध्ये हायब्रीड तंत्रज्ञान देऊ शकते. या तंत्रज्ञानामुळे पेट्रोलचा वापर कमी होण्यास मदत होऊ शकते. प्राथमिक अंदाजानुसार, ही बाईक प्रति लिटर सुमारे 40 ते 45 किलोमीटर मायलेज देईल. कंपनी माईल्ड-हायब्रीड प्रणाली देईल की इतर कोणते हायब्रीड तंत्रज्ञान वापरेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नवीन 250 सीसी बाईक्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य त्यांची परवडणारी किंमत असू शकते. कंपनी त्यांना सध्याच्या 350 सीसी मॉडेल्सपेक्षा कमी किंमतीत ठेवू शकते, ज्यामुळे कमी बजेट असलेल्या ग्राहकांनाही रॉयल एनफील्ड खरेदी करणे शक्य होईल . अहवालानुसार, या बाईक्सची सुरुवातीची किंमत ₹1.25 लाख ते ₹1.50 लाख दरम्यान असू शकते. खरी किंमत लॉन्चच्या वेळी जाहीर केली जाईल.

रॉयल एनफिल्डची ही तयारी अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारतात अधिक शक्तिशाली बाईक्सची विक्री वाढत आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये 250 सीसी ते 800 सीसी पर्यंतच्या बाईक्सच्या विक्रीने 12.7 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. पाच वर्षांपूर्वी हा आकडा सुमारे 55 लाख युनिट्स होता. एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत 200-250 सीसी बाईक्सच्या विक्रीत 75 टक्क्यांनी वाढ होऊन ती 1,91,126 युनिट्सवर पोहोचली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us