
Maruti 800 : सचिन तेंडूलकरच्या कार कलेक्शनमध्ये सर्वात पहिले मारुती 800 दाखल झाली होती. ही कार आता फार कमी लोकांकडे दिसते. मॅन्युअल ट्रान्समिशनची ही कार 59Nm@2500rpm टार्क जेनरेट करते. ही एक बजेट फ्रेंडली कार म्हणून ओळखली जाते.

360 Modena Ferrari : फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकल शूमाकर याने 2002 मध्ये सचिन तेंडूलकर याला 360 मोडेना फेरारी गिफ्ट दिली होती. पण सचिनने 2011 मध्ये ही कार विकली. सचिनची कार बॉलिवूड चित्रपट ‘फेरारी की सवारी’ मध्ये पण दाखविण्यात आले होते. सचिन BMW इंडियाचा ब्रँड एम्बेसेडर आहे.

Nissan GT-R : ही GT-R कार 550 Bhp जेनरेट करते. ही कार 2.9 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रति तासाचा वेग घेते. या कारची किंमत जवळपास 2.4 ते 2.12 कोटी रुपये आहे.

BMW X5M :बीएमडब्लू थर्ड जेनरेशन (F15) हाय परफॉर्मेन्स X5, 4.4L V8 इंजिन आणि 4.2 सेंकदात 0-100 किलोमीटर प्रति ताशी वेगाने धावते.

BMW i8 : ही कार 1.5 लिटर पेट्रोल इंजिनमुळे 357 hp ची पॉवर आणि 520 Nm चा टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत जवळपास 2.54 कोटी रुपये आहे. याशिवाय सचिनकडे BMW M5 JAHRE EDITION, Mercedes C36 AMG सारख्या आलिशान कार पण आहेत.