ठरलं! बहुप्रतीक्षित Skoda Kushaq पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार, जुलैमध्ये डिलीव्हरी

Skoda Vision In Concept या कारने ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर या कारला नाव आणि ओळख मिळाली आहे.

ठरलं! बहुप्रतीक्षित Skoda Kushaq पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार, जुलैमध्ये डिलीव्हरी
Skoda Kushaq SUV
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 4:26 PM

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे भारतात स्कोडा कुशक (Skoda Kushaq) या कारचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. तथापि, काही कार उत्पादक आता प्रलंबित लाँचसाठी तयार आहेत. स्कोडा ऑटो इंडिया (Skoda Auto India) ही त्यापैकीच एक कंपनी आहे. कंपनीने यंदा मार्चमध्ये एक लाँच इव्हेंट केला होता. त्यानंतर ते त्यांची ‘मेड फर्स्ट फॉर इंडिया’ कार Skoda Kushaq याच महिन्यात बाजारात दाखल करणार होते. परंतु ही मिड साईज एसयूव्ही अद्याप लाँच करण्यात आलेली नाही. (Skoda Kushaq to launch in India by June end delivery will start in July 2021)

लेटेस्ट डेव्हलपमेंटनुसार, कार निर्माता कंपनी जूनच्या शेवटी स्कोडा कुशक (Skoda Kushaq) एसयूव्हीची किंमत आणि तपशीलवार माहिती जाहीर करू शकते. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी Kushaq ही कार अधिकृतपणे 18 मार्च रोजी भारतात सादर करण्यात आली होती. परंतु अद्याप ही गाडी उपलब्ध झालेली नाही. ट्विटरवर काही युजर्सनी या कारच्या लाँच टाईमलाईनबाबत कंपनीला सवाल केले होते. त्यानंतर यापैकी एका युजरला स्कोडा ऑटो इंडियाचे संचालक झॅक हॉलिस यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

हॉलिस म्हणाले की, “पुढील महिन्याच्या शेवटी सर्व किंमती आणि फीचर्सची घोषणा केली जाईल. बुकिंग एकाच वेळी सुरु केलं जाईल आणि जुलैमध्ये वितरण (डिलीव्हरी) सुरू केलं जाईल.”

कशी आहे Skoda Kushaq?

Skoda Vision In Concept या कारने ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर या कारला नाव आणि ओळख मिळाली आहे. कंपनीने या कारला स्कोडा कुशक (Skoda Kushaq) असं नाव दिलं आहे. कंपनीने कुशक हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला आहे. कुशक या शब्दाचा अर्थ आहे शासक, सम्राट किंवा राजा. ही व्हीकल मार्केटमध्ये ह्युंदाय क्रेटा आणि किया सेल्टॉस या गाड्यांना टक्कर देणार आहे. या मॉडेलचं लेटेस्ट अपडेट कंपनीने सादर केलं आहे. ही कार फोक्सवॅगन ग्रुपच्या ‘इंडिया 2.0’ प्रोजेक्टअंतर्गत तयार करण्यात आलेली पहिली कार आहे.

कसं असेल इंटीरियर?

दरम्यान, स्कोडा ऑटो इंडियाने त्यांच्या आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्ही, स्कोडा कुशकच्या इंटीरियरचे डिझाईन स्केच जाहीर केले. मध्यभागी इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि 2021 स्कोडा सुपर्बमध्ये दिसणारे स्टायलिश 2-स्पोक स्टीयरिंग व्हीलचा समावेश करण्यात आला आहे. या कारच्या केबिनचे मुख्य आकर्षण 10 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन असेल, जी Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सारख्या फीचर्ससह मिळेल. कुशक एका मोठ्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठ्या एअर-कॉन व्हेंट्ससह, प्रशस्त केबिनसह येईल.

कंपनीने अद्याप या कारच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. ही कार भारतीयांना परवडणारी असेल, असं म्हटलं जात आहे. नुकतीच या कारची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. या शानदार SUV च्या प्रोडक्शन मॉडलची एक झलक स्केचच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. कंपनीने नुकतचं या कारचं एक स्केच जारी केलं आहे. ज्यामध्ये या कारचं डिझाईन पाहायला मिळालं.

स्कोडा कुशकचं डिझाईन

भारतीय बाजारात स्कोडा कुशकचं जे डिझाईन सादर झालं आहे, हे डिझाईन 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केलेल्या स्कोडा व्हिजन इन कॉन्सेप्टवरुन प्रेरणा घेत बनवलं आहे. या डिझाईनवरुन लक्षात येतंय की, या कारच्या पुढच्या भागात दोन भागांमध्ये विभागलेल्या हेडलाईट्स मिळतील. अंडरराईड सुरक्षा असलेलं बम्पर या एसयूव्हीला अॅथलेटिक लुक प्रदान करतं. कारचं बोनेटही जबरदस्त दिसेल असंच डिझाईन करण्यात आलं आहे. कारचं प्रोफाईल तुम्हाला कारोक आणि कोडियाकच्या डिझाईनची आठवण करुन देतं.

भारतीय बनावटीची कार

दरम्यान,कंपनीने म्हटलं आहे की, कुशक ही कार यावर्षी भारतात लाँच केली जाईल. ही कार 93 टक्के भारतीय बनावटीची आहे. कारण या कारमधील 93 टक्के भाग हे भारतात बनवण्यात आले आहेत, अगदीच काही भाग परदेशातून आयात करण्यात आले आहेत. कंपनीने या व्हीकलच्या इंजिन ऑप्शन्स आणि डायमेंशनसह कम्फर्टवर बरंच काम केलं आहे. स्कोडा कुशक MQB-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये 2651 मिमीचं व्हीलबेस असेल जे स्कोडा कॉन्सेप्टच्या व्हीलबेसच्या तुलनेत 20 मिमी लहान आहे. कुशकच्या टॉप-एंड ट्रिम्समध्ये एलईडी हेडलाइट्स आणि डे टाईम रनिंग लाइट्सची (डीआरएलएस) सुविधा असेल. टेल आणि ब्रेक लाइट्सही देण्यात आल्या आहेत.

शानदार फिचर्स

ही भारतातील स्कोडाची पहिली कनेक्टेड कार असेल ज्यामध्ये MySkoda Connect टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये लेटेस्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह 12.3 इंचांची सेंट्रल टच स्क्रीन दिली जाणार आहे. यामध्ये ऑटोमॅटिक एयर कंट्रोल सिस्टिम, सनरुफ आणि अडॅप्टिव्ह लाईटसारखे फिचर्स दिले जाणार आहेत. कारच्या सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 6 एयरबॅग्स (ऑप्शनल फ्रंट साईड एयरबॅग आणि कर्टेन एयरबॅग) असतील. तसेच सर्व ट्रिम्समध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) दिलं जाईल. तर टॉप-वेरिएंटमध्ये हिल-होल्ड कंट्रोल, रेन-लाईट सेन्सर, एक क्रुझ कंट्रोल सिस्टिम आणि टायर प्रेशर मॉनिटरही दिले जातील.

कुशक नावामागची कथा

स्कोडा कंपनीने कुशक या कारबाबत माहिती दिली आहे की, संस्कृत भाषा जगभरातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. ही आता भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. या नावाद्वारे कंपनी स्वतःला भारतीय उपमहाद्वीपाशी जोडू पाहतेय. तसेच ‘कुशक’ नावाचा अर्थ कंपनीच्या या मॉडलसाठी परफेक्ट आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे. ‘स्कोडा कुशक’ या नावाची घोषणा करताना कंपनीने ‘Make way for the one true king’ ही टॅगलाइनही दिली आहे.

इंडिया 2.0 प्रोजेक्ट

चेक प्रजासत्ताक (Czech Republic) देशातील आघाडीची कार निर्माती कंपनी स्कोडाने भारतातील त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी इंडिया 2.0 प्रकल्पाची सुरुवात केली आहे. ‘कुशक’ ही स्कोडाची या प्रकल्पांतर्गत पहिली कार आहे. कंपनीने ही कार स्थानिक स्तरावरील Modulare Querbaukasten (MQB) A0 IN प्लॅटफॉर्मवर बनवली आहे.

इतर बातम्या

आधी पार्किंगची जागा दाखवा मगच कार खरेदी करा; सरकारची New Parking Policy

सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक कारची भारतात रेकॉर्डब्रेक विक्री

कार मेंटेनन्सचं टेन्शन विसरा, Hyundai चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

(Skoda Kushaq to launch in India by June end delivery will start in July 2021, Made First for India Car)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.