AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार मेंटेनन्सचं टेन्शन विसरा, Hyundai चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

ह्युंदाय इंडियाने (Hyundai India) जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत.

कार मेंटेनन्सचं टेन्शन विसरा, Hyundai चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली
Hyundai Kona N Suv
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 16, 2021 | 4:38 PM
Share

मुंबई : ह्युंदाय इंडियाने (Hyundai India) जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. (Hyundai India extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)

कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

ह्युंदाय मोटर इंडियाचे (Hyundai Motor India) सेल्स, मार्केटिंग अँड सर्व्हिस विभागाचे संचालक तरुण गर्ग म्हणाले, या कठीण काळात ह्युंदायने लाइफ सेव्हिंग मेडिकेयर ऑक्सिजन इक्विपमेंट देण्यासह कंपनीने अनेक कार्यक्रम सुरु केले आहेत, जेणेकरून देशभरातील लोकांना थोडा दिलासा मिळेल.

Tata Motors चं ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट

टाटा मोटर्सने (Tata Motors) जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

टाटा मोटर्सच्या कस्टमर केअर हेड डिंपल मेहता यांनी जाहीर केले की, कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांचं घराबाहेर पडणं बंद झालं आहे. अशा परिस्थितीत सध्या कोणताही ग्राहक त्यांच्या कारच्या सर्व्हिस आणि दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरला जाऊ शकत नाही. अशा परिस्थिती ज्या ग्राहकांची सर्व्हिस आणि वॉरंटी अद्याप प्रलंबित आहे अशा ग्राहकांसमोर आव्हान उभे आहे.

Maruti ने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

मारुती सुझुकीने बुधवारी जाहीर केले की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 15 मार्च ते 31 मे दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी म्हणाले आहेत की, आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी ही घोषणा केली आहे. आम्ही वाहनांची विनामूल्य सर्व्हिस, वॉरंटी आणि एक्सटेंडेड वॉरंटी 30 जून पर्यंत वाढविली आहे. दरम्यान, मारुतीसह इतर अनेक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या

ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?

Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

(Hyundai India extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट