Solar Car : आता सोलार चार्जिंग कारचा जमाना, कार चालवताना आपोआप चार्जिंग, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

| Updated on: Jul 28, 2022 | 6:04 AM

सोनो मोटर्सच्या या नवीन कारं उत्पादन पुढील वर्षी 2023 पासून सुरू होईल. येत्या सात वर्षांत 2.5 लाख वाहनांचं उत्पादन करणार. इंधनाचा खर्च वाचवायचा असल्याच ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे.

Solar Car : आता सोलार चार्जिंग कारचा जमाना, कार चालवताना आपोआप चार्जिंग, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या...
Solar Car
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आता सोलर चार्जिंग (Solar Car) असलेली कार (Car) बाजारात दाखल होणार आहे. ही कार रोडवर धावताना आपोआप चार्ज होईल. खरं तर जर्मन स्टार्ट-अप सोनो मोटर्सनं सौर उर्जेनं बॅटरी चार्ज करणारी इलेक्ट्रिक कार द सायनची अंतिम मालिका उत्पादन प्रकाराचं अनावरण केलं आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक इलेक्ट्रिक कार (Electric car) आहेत. यावर्षी होंडा टोयोटा आणि मारुतीनं आपापल्या हायब्रिड कार सादर केल्या आहेत. ही कार लाँच केल्यानंतर अनेक वाहनांना मात देऊ शकते. कारण, गाडीला इंधनाचा खर्च नाही. गाडी आपोआप रोडवर चालताना चार्ज होईल. याचाच अर्थ असा की, थेट आपल्या खर्चावर परिणाम होईल म्हणजे आपला इंधनाचा खर्च वाचेल. यामुळे या कारची विशेष वाट पाहिली जात आहे. याविषयी अधिक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या…

सोनो मोटर्सच्या या नवीन कारं उत्पादन पुढील वर्षी 2023 पासून सुरू होईल. येत्या सात वर्षांत 2.5 लाख वाहनांचं उत्पादन करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. या सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारचे प्री-बुकिंग सुरू झाले असून कंपनीला 19000 युनिट्सचे प्री-बुकिंग मिळाले आहे. या कारची संभाव्य किंमत 25000 डॉलर (19,94,287 रुपये) असू शकते. मात्र, कंपनीनं अद्याप त्याची एक्स-शोरूम किंमत जाहीर केलेली नाही. तसेच भारतासह इतर देशांमध्ये केव्हा लाँच होईल हे कंपनीने अद्याप सांगितलेले नाही.

ड्रायव्हिंग रेंज काय असेल

हे पाच दरवाजांचे इलेक्ट्रिक वाहन आहे. ज्यामध्ये 456 सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ही कार 112 किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते. त्याची बॅटरी चार्ज करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल, ज्याच्या मदतीनं एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 300 किमीपर्यंत प्रवास करू शकते.

हे सुद्धा वाचा

सोलर पॅनल

सोलर पॅनेल हे एक प्रकारचे कन्व्हर्टर आहे. ते सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करते. सौर पॅनेल अनेक सौर पेशींनी बनलेले असतात. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाराला विज्ञानात फोटॉन म्हणतात. सोलर सेलमधून मिळणारी विद्युत ऊर्जा सौर इन्व्हर्टरच्या मदतीने बॅटरीमध्ये साठवली जाते किंवा ती घरात वापरली जाते.

काय फायदा होणार?

गाडी आपोआप रोडवर चालताना चार्ज होईल. याचाच अर्थ असा की, थेट आपल्या खर्चावर परिणाम होईल म्हणजे आपला इंधनाचा खर्च वाचेल. यामुळे या कारची विशेष वाट पाहिली जात आहे. याविषयी अधिक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.