AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MG Hector Facelift : एमजी हेक्टरचा टीझर रिलीज, भारतातील सर्वात मोठी 14-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळेल, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या….

14-इंचाची HD पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. विशेष म्हणजे हे फीचर्स भारता पहिल्यांदाच कोणती कंपनी देते आहे. ब्रँडनुसार नेक्स्ट-जेन हेक्टरच्या इंटीरियरची संकल्पना 'सिम्फनी ऑफ लक्झरी' वर आधारित आहे.

MG Hector Facelift : एमजी हेक्टरचा टीझर रिलीज, भारतातील सर्वात मोठी 14-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळेल, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या....
MG Hector FaceliftImage Credit source: social
| Updated on: Jul 27, 2022 | 1:06 PM
Share

मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) लाँचिंगच्या आधीच पहिल्यांदा 2022 हेक्टर फेसलिफ्ट (2022 Hector Facelift) एसयूव्हीचा टीझर लाँच केला आहे. 2022 MG Hector या एमजी मोटार इंडियाच्या कारला (Car) मीड लाइफ फेसलिफ्ट मिळेल. भारतातील सर्वात मोठी 14-इंचाची HD पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. विशेष म्हणजे हे फीचर्स भारता पहिल्यांदाच कोणती कंपनी देते आहे. ब्रँडनुसार नेक्स्ट-जेन हेक्टरच्या इंटीरियरची संकल्पना ‘सिम्फनी ऑफ लक्झरी’ वर आधारित आहे. जे भारतातील सर्वात मोठ्या पडद्यासाठी एक सिनेमॅटिक आणि चांगला अनुभव देते. कोणतीही कार घेताना त्याविषयी अधिक माहिती असायला हवी. आज आम्ही खास तुमच्यासाठी 2022 हेक्टर फेसलिफ्ट या कारविषयी माहिती देणार आहोत. त्यामुळे या कारविषयी तुम्ही या बातमीत अधिकाधिक तुम्ही जाणून घ्या…

टीझर पाहा

व्हॉईस कमांड फंक्शन्स

भारतातील ऑटोमेकर्स 10.4-इंच आकारापर्यंत टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन ऑफर करत आहेत. ज्यामुळे MG हेक्टरची स्क्रीन लाँच झाल्यापासून सर्वात मोठी होईल. दुसरीकडे टेस्ला सारख्या ऑटोमेकर्स मॉडेलवर अवलंबून 14 इंच ते 17 इंच आकाराच्या स्क्रीन ऑफर करत आहेत. MG Hector भारतीय बाजारपेठेत 2019 मध्ये लाँच करण्यात आला होता. गाना, Accuweather यासह अनेक इनबिल्ट सॉफ्टवेअर ऑफर करणारी ही भारतातील पहिली कार होती.  तिने स्वतःला ‘भारताची पहिली इंटरनेट कार’ म्हणून ब्रँड केले होते. MG ने भारतीय बोलींनुसार अनेक भाषांमध्ये व्हॉईस कमांड फंक्शन्स देखील सादर केले.

ऑटो पार्क असिस्ट

देशात MG Astor लाँच करून मध्यम आकाराच्या विभागात ADAS Level-2 वैशिष्ट्ये देणारी MG Motor ही पहिली ऑटोमेकर बनली आहे. त्यामुळे नवीन हेक्टरला ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट अलर्ट, ऑटो पार्क असिस्ट यासारखीच प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणाली मिळण्याची शक्यता आहे.

पॉवरट्रेन पर्याय

फेसलिफ्टेड एमजी हेक्टरला 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 2.0-लीटर डिझेल इंजिन सारखे पॉवरट्रेन पर्याय मिळण्याची शक्यता आहे. पहिला जास्तीत जास्त 143 PS चा पॉवर आउटपुट आणि 250 Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशन पर्यायासह उपलब्ध आहे. मॅन्युअल ट्रिम 48-व्होल्ट सौम्य-हायब्रिड तंत्रज्ञानासह उपलब्ध असेल. टर्बो डिझेल 170 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते आणि फक्त 6-स्पीड एमटी ट्रान्समिशनमध्ये येते. कोणतीही कार घेताना याविषयी अधिक जाणून घ्यायला हवं, यामुळे आपल्याला अधिकाधिक फीचर्स मिळू शकतील.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.