नवीन Suzuki Scooter भारतात लाँच, जुन्या व्हर्जनपेक्षा स्वस्त, नवीन स्कूटरमध्ये काय आहे खास?

| Updated on: Apr 01, 2022 | 4:11 PM

Suzuki Avenis 125 Standard editions price in india: सुझुकी अवेनिस 125 स्टँडर्ड एडिशन स्कूटरला बाजारात टीव्हीएस एनटॉर्क 125 सोबत स्पर्धा करावी लागेल. तसेच बाजारात Honda Grazia आणि Yamaha RAZR सुद्धा उपलब्ध आहेत.

नवीन Suzuki Scooter भारतात लाँच, जुन्या व्हर्जनपेक्षा स्वस्त, नवीन स्कूटरमध्ये काय आहे खास?
Suzuki Avenis 125 Standard edition
Follow us on

Suzuki Avenis 125 Standard Edition price: सुझुकीने (Suzuki) ने भारतीय दुचाकी बाजारात (Two Wheeler market) आपली नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरचे नाव सुझुकी अवेनिस 125 स्टँडर्ड एडिशन (Suzuki Avenis 125 Standard Edition) असे आहे. या स्कूटरची किंमत 86,500 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर 125 cc एअर-कूल्ड इंजिनसह सुसज्ज आहे, जे 8.7 PS पॉवर आणि 10 Nm टॉर्क जनरेट करते. या व्हर्जनमध्ये, कंपनीने जुने सर्व फीचर्स दिले आहेत. यापूर्वी कंपनीने राइड कनेक्ट एडिशन आणि रेड एडिशन सादर केले आहेत. जपानी वाहन उत्पादक कंपनीच्या या स्कूटरला मोठी मागणी आहे. या नवीन सुझुकी स्कूटरची किंमत 86,500 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे, जी कंपनीच्या इतर व्हेरिएंटपेक्षा 3000 रुपयांनी कमी आहे.

Suzuki Avenis 125 स्टँडर्ड व्हेरियंटला एक्सटर्नल हिंज टाइप फ्यूल कॅप मिळते, ज्यामुळे इंधन भरणे (रिफ्यूलिंग) सोपे होते. यामध्ये सीटखाली अधिक बूट स्पेस देण्यात आली आहे. यात मोटारसायकल-प्रेरित रियर टर्न इंडिकेटर मिळते. यासोबतच यामध्ये बॉडी माउंटेड एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी टेल लॅम्प देण्यात आले आहेत. मात्र, कंपनीने याच्या परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात सिंगल सिलेंडर 125 सीसी फ्यूल इंजेक्टेड एअर कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे.

Suzuki Avenis 125 Standard Edition चे फीचर्स

Suzuki Avenis 125 Standard Edition चं पॉवरट्रेन 6750 rpm वर 8.7 PS पॉवर आणि 5500 rpm वर 10 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकतं. या स्कूटरच्या इंजिनसोबत CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या स्कूटरचे वजन 106 किलोग्रॅम इतकं आहे, जे स्कूटरचे सरासरी वजन आहे.

Suzuki Avenis 125 Standard मध्ये काय नसेल

रेस इंस्पायर्ड मोटोजीपी ग्राफिक्स आणि कनेक्ट फीचर्स सुझुकी एवेनिस 125 स्टँडर्ड एडिशनमध्ये उपलब्ध नसतील. जुन्या मॉडेलमध्ये कंपनीने मेटॅलिक फायब्रोइन ग्रे, मेटॅलिक लश ग्रीन, ग्लास स्पार्कल ब्लॅक कलर दिले होते.

सुझुकी एवेनिस 125 स्टँडर्ड एडिशनची स्पर्धा

Suzuki Avenis 125 Standard Edition स्कूटर TVS Ntorq 125, Aprila SR 125, Honda Grazia आणि Yamaha RAZR शी स्पर्धा करेल. या स्कूटरला मोटरसायकल-प्रेरित ग्रॅब रेल देण्यात आलं आहे. त्यात एक स्पोर्टी मफलर कव्हरही आहे. त्याचं डिझाईन खूपच आकर्षक

इतर बातम्या

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स