Maruti-Tata ते Mercedes-Audi, नव्या वर्षात वाहनांच्या किंमती वाढल्या, ग्राहकांच्या खिशाला कात्री

नवीन वर्षापासून कारच्या किंमती वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे अनेक मोठ्या कार कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. आजपासून नवीन दर लागू होतील.

Maruti-Tata ते Mercedes-Audi, नव्या वर्षात वाहनांच्या किंमती वाढल्या, ग्राहकांच्या खिशाला कात्री
Car Price Hike (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 10:59 AM

मुंबई : नवीन वर्षापासून कारच्या किंमती वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे अनेक मोठ्या कार कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. आजपासून नवीन दर लागू होतील. कोरोना या साथरोगामुळे जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्या मोठा फटका सहन करत आहेत. आधी अचानक उत्पादन बंद झाल्यामुळे नुकसान झाले आणि नंतर ते पूर्ववत झाल्यावर सेमीकंडक्टरसारख्या उत्पादनांच्या कमतरतेमुळे उत्पादन थांबले. कच्चा माल, इतर पार्ट्स आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे आपल्या देशातील कार निर्मात्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा पर्याय निवडला आहे

2022 च्या जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली जात आहे. भारतीय ऑटोमोबाईल कंपन्या बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. सेमीकंडक्टर चिप्सची खरेदी आणि इनपुट मटेरियलच्या कमतरतेमुळे नवीन वाहनांचे उत्पादन मंदावले आहे. या सर्व समस्यांनी वाहन कंपन्या त्रस्त आहेत, त्यामुळे वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी वाहन निर्मात्या कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जाणून घेऊयात या वर्षी कोणकोणत्या कंपन्यांनी गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत.

मारुती सुझुकीच्या गाड्या महागल्या

मारुती सुझुकीने अलीकडेच स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे की, ते 1 जानेवारी 2022 पासून किमती वाढवतील. ऑटोमेकरने 2021 मध्ये आपल्या वाहनांच्या किमतीत 4.9% ने वाढ केली आहे. या कंपनीच्या वाहनांच्या किमती जानेवारीमध्ये प्रथम 1.4 टक्के, नंतर एप्रिलमध्ये 1.6 टक्के आणि शेवटी सप्टेंबरमध्ये 1.9 टक्क्यांनी वाढल्या.

मारुतीने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, “गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे, कंपनीसाठी हे अत्यावश्यक बनले आहे की ग्राहकांवर अतिरिक्त खर्चाचा काही भार देऊन तोटा भरुन काढला जाईल.

टाटा मोटर्सनेही किंमती वाढवल्या

देशातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सनेही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. जानेवारी महिन्यात कंपनीच्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत बदल दिसून येतील. ही वाढ अंदाजे 2.5% इतकी आहे. ही घोषणा नुकतीच करण्यात आली असताना, टाटाने आधीच त्यांच्या फ्लॅगशिप SUV, सफारीच्या किमती ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 7,000 रुपयांनी वाढवल्या होत्या.

टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल्स बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले, “कच्च्या मालाच्या किमती आणि इतर इनपुट कॉस्ट वाढतच आहेत. वाढत्या किंमतीच्या परिणामावर मात करण्यासाठी कंपनीला जानेवारी 2022 पासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवणे भाग पडले आहे.

फोक्सवॅगनचा दरवाढीचा निर्णय

फोक्सवॅगनने गुरुवारी जाहीर केले की, ते नवीन वर्षात 1 जानेवारीपासून पोलो, व्हेंटो आणि मध्यम आकाराच्या एसयूव्ही टायगुनच्या किमती वाढवणार आहेत. फॉक्सवॅगन आता अशा कार निर्मात्यांपैकी एक आहे ज्यांनी जानेवारीपासून दरवाढीची पुष्टी केली आहे. देशातील इतर अनेक ब्रँड्सप्रमाणे, फोक्सवॅगनने वाढत्या इनपुट्स आणि ऑपरेशनल कॉस्टमुळे किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मॉडेल आणि निवडलेल्या व्हेरिएंटवर अवलंबून किंमत वाढ 2% ते 5% दरम्यान असेल. फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले की, “इनपुट आणि ऑपरेशनल खर्चात भरीव वाढ झाल्यामुळे, आम्ही आमच्या उत्पादनांच्या किमती 2% ते 5% ने वाढवण्याचा आणि ग्राहकांवर होणारा परिणाम कमीत कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.” आमचा ब्रँड, उत्पादने आणि सेवा अधिक सुलभ बनवण्याचा आणि फोक्सवॅगनला आमच्या ग्राहकांमध्ये पसंतीचा ब्रँड म्हणून स्थापित करण्याचा आमचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न आहे.”

टोयोटा किर्लोस्कर मोटर

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की 1 जानेवारी 2022 पासून ते त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवतील. वाढत्या इनपुट कॉस्टला कंपनीने याचे श्रेय दिले आहे. ही दरवाढ टोयोटाने ऑफर केलेल्या सर्व मॉडेल्सवर लागू होईल ज्यात इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर, ग्लान्झा, अर्बन क्रूझर, कॅमरी आणि वेलफायर हाइक यांचा समावेश असेल. मात्र, दरवाढ एकाच वेळी होणार नाही.

होंडा इंडिया

Honda India कंपनी इतर सर्व वाहन निर्मात्यांसोबत जानेवारी 2022 पासून त्यांच्या वाहनांची किंमत वाढविण्याचा विचार करत आहे. कंपनीने या वर्षी ऑगस्टमध्ये शेवटची किंमत वाढवली होती. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “कमोडिटीच्या किमती वाढल्यामुळे इनपुट कॉस्टवर लक्षणीय परिणाम झाला आहे. Honda ने काही महिन्यांपूर्वी पाचव्या जनरेशनमधील होंडा सिटी लाँच केली होती. हेच कंपनीचे अखेरचं लाँचिंग होतं.

व्होल्वो कार इंडिया

व्होल्वो कार इंडियानेही आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन किमती 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. कंपनीचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत, महामारीमुळे, निर्बंध आणि महागाईमुळे (inflationary) जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे.

स्कोडा

स्कोडा ऑटोने 1 जानेवारी 2022 पासून त्यांच्या सर्व वाहनांच्या किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत बाजारात, स्कोडा ऑटो कंपनी ऑटो कुशाक, कोडियाक, ऑक्टाव्हियासह अनेक मॉडेल्सची विक्री करते, स्टील, अॅल्युमिनियम सारख्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वाहन उत्पादकांना वाहनांच्या किमती वाढवाव्या लागत आहेत.

मर्सिडीज बेंझ

Mercedes-Benz ने निवडक मॉडेल्सवर 2% ची वाढ जाहीर केली आहे, तरीही कंपनी काही मॉडेल्सवर सूट देत आहे. मर्सिडीजने स्पष्ट केले आहे की, ज्या ग्राहकांनी त्यांचे MY2021 मॉडेल बुक केले आहेत आणि त्यांच्या डिलिव्हरीची वाट पाहत आहेत त्यांना खरेदीच्या वेळी त्याच किमतीत वाहन मिळेल. याव्यतिरिक्त, जे ग्राहक 31 डिसेंबरपर्यंत ए-क्लास, जीएलए आणि ई-क्लास सारख्या निवडक रेंजमधील कार बुक करतील, त्यांनाही सवलत मिळेल.

ऑडी

ऑडीने त्याच्या संपूर्ण मॉडेल पोर्टफोलिओमधील वाहनांची किंमत 3% ने वाढवली आहे. इतर सर्व कार कंपन्यांप्रमाणेच ऑडीनेही किमतीत वाढ होण्याचे श्रेय इनपुट खर्च वाढण्याला दिले आहे.

इतर बातम्या

टेस्लाच्या तब्बल 4.75 लाख गाड्यांमध्ये दोष? कंपनीने कार परत मागवल्या

Hero Pleasure ते Honda Dio, 2021 मधील देशातील टॉप 5 स्कूटर्स, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या, जाणून घ्या टॉप 5 कार्सच्या किंमती आणि फीचर्स

(Tata, Maruti, Mercedes, Audi, honda, toyota cars will become more expensive in new year))

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.