भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या, जाणून घ्या टॉप 5 कार्सच्या किंमती आणि फीचर्स

भारतात सध्या लिमिटेड EV पर्याय आहेत जे कोणीही खरेदी करू शकतात. आज आम्ही तुम्हाला आपल्या मार्केटमधील चार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक 4-व्हीलर्सची माहिती देणार आहोत.

Dec 31, 2021 | 6:30 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 31, 2021 | 6:30 AM

भारतात सध्या लिमिटेड EV पर्याय आहेत जे कोणीही खरेदी करू शकतात. आज आम्ही तुम्हाला आपल्या मार्केटमधील चार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक 4-व्हीलर्सची माहिती देणार आहोत.

भारतात सध्या लिमिटेड EV पर्याय आहेत जे कोणीही खरेदी करू शकतात. आज आम्ही तुम्हाला आपल्या मार्केटमधील चार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक 4-व्हीलर्सची माहिती देणार आहोत.

1 / 5
Tigor Ziptron ही कॉम्पॅक्ट सेडान आहे. ही कार 26 kWh बॅटरीसह सुसज्ज आहे जी सिंगल चार्जमध्ये 306 किमीची रेंज देते.15 अँपिअर वॉल अॅडॉप्टर वापरून कारला 80 टक्के चार्ज करण्यासाठी साडेआठ तास लागतात, तर डीसी फास्ट चार्जर वापरून बॅटरी एका तासात 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते. या कारची किंमत 11.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते.

2 / 5
Tata Nexon EV ही सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक फोर-व्हीलर आहे. Nexon मध्ये 30.2 kWh बॅटरी आहे जी सिंगल चार्जवर 312 किमीची रेंज देते. डीसी फास्ट चार्जिंग पर्यायाचा वापर करून बॅटरी फक्त एका तासात 80 टक्के चार्ज होऊ शकते. या कारची किंमत 13.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

3 / 5
MG ची देशातील एकमेव EV, ZS EV ला 2021 मध्ये किरकोळ अपडेट देण्यात आले. कार 44-kWh बॅटरीसह येते. कार सिंगल चार्जवर 419 किलोमीटरची रेंज देते. ZS EV नियमित 15 amp वॉल सॉकेट वापरून 17 ते 18 तासांच्या आत पूर्णपणे चार्ज होऊ शकते, तसेच फास्ट चार्जर वापरुन 50 मिनिटांत ही बॅटरी 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. या कारची किंमत 20.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

4 / 5
कोना इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात सर्वात आधी लॉन्च करण्यात आली होती. यामध्ये दिलेली 39.2 kWh बॅटरी Kona ला सिंगल चार्जवर 452 किमी मायलेज देण्यास सक्षम आहे. फास्ट चार्जरने ही कार एका तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. 23.79 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह, कोना ही या यादीतील सर्वात महागडी ईव्ही आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें