टेस्लाच्या तब्बल 4.75 लाख गाड्यांमध्ये दोष? कंपनीने कार परत मागवल्या

टेस्लाच्या तब्बल 4.75 लाख गाड्यांमध्ये दोष? कंपनीने कार परत मागवल्या
Tesla (प्रातिनिधिक फोटो)

टेस्ला इंकने अमेरिकी सुरक्षा नियामकानुसार (अमेरिकी सेफ्टी रेग्युलेटर) 4,75,000 हून अधिक कार परत मागवण्याचा आदेश जारी केला आहे. परत मागवलेल्या कारमध्ये मॉडेल 3 आणि मॉडेल एस इलेक्ट्रिकचा समावेश आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 31, 2021 | 6:11 PM

मुंबई : टेस्ला इंकने अमेरिकी सुरक्षा नियामकानुसार (अमेरिकी सेफ्टी रेग्युलेटर) 4,75,000 हून अधिक कार परत मागवण्याचा आदेश जारी केला आहे. परत मागवलेल्या कारमध्ये मॉडेल 3 आणि मॉडेल एस इलेक्ट्रिकचा समावेश आहे, ज्यांची निर्मिती 2014 ते 2021 दरम्यान करण्यात आली होती. यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने म्हटले आहे की मॉडेल 3 सेडानसाठी, या युनिट्सवरील रिअरव्ह्यू कॅमेरे आणि ट्रंक खराब होऊ शकतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. (Tesla to recall 475,000 cars rear camera connection issue)

रॉयटर्सने अहवाल सादर केला आहे की संभाव्य प्रभावित मॉडेल 3 EV ची समस्या मागील कॅमेऱ्याला नुकसान झाल्यामुळे उद्भवण्याची शक्यता आहे जेव्हा मागील ट्रंक उघडला आणि बंद केला जातो. अशीही शक्यता आहे की, यापैकी काही युनिट्समध्ये सदोष लॅच आहे ज्यामुळे पुढील ट्रंक कोणतीही पूर्व सूचना न देता उघडते. हे अत्यंत धोकादायक असू शकते कारण कार धावत असताना जर ट्रंक ओपन झाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

टेस्लाने सांगितले आहे की या समस्यांमुळे झालेल्या कोणत्याही अपघात किंवा नुकसानाबद्दल त्यांना माहिती नाही. मात्र त्याच वेळी रिकॉल ऑर्डर जारी करताना, टेस्लाचा स्टॉक आठ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे वृत्त आहे, याचा अर्थ शेअर्स कमी होण्यापासून रोखण्यासाठी कंपनीचे हे पाऊल पुरेसे नव्हते.

क्वालिटी चेक करण्यासाठी कठोर पावलं

टेस्ला ही जगातील सर्वात मोठी ईव्ही निर्माती कंपनी आहे आणि ती इतर प्रत्येक स्पर्धकाला जोरदार टक्कर देत आहे. परंतु मागणी वाढत असताना, अनेक बाजारपेठांमध्ये क्वालिटी कंट्रोलची समस्या देखील आहे जिथे कंपनी अनेकदा गडबडलेली असते. त्यात जगातील सर्वात मोठी ईव्ही बाजारपेठ असलेल्या चीनचाही समावेश आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी वारंवार सांगितले आहे की क्वालिटी चेक करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जाते, काहींच्या मते, उत्पादन आणि पुरवठ्याला गती देण्यासाठी, गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

टेस्ला आगामी काळात बाजारात बाजी मारेल

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की टेस्ला 2022 पर्यंत त्यांच्या सर्व कम्पटीटर्सवर आपली आघाडी वाढवण्याची शक्यता आहे, विशेषत: कंपनी टेक्सास सुविधेसह ऑपरेशन सुरू करण्यास पूर्णपणे तयार आहे.

इतर बातम्या

भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या, जाणून घ्या टॉप 5 कार्सच्या किंमती आणि फीचर्स

Yamaha Aerox 155 ते TVS Jupiter 125, 2021 मध्ये लॉन्च झाल्या शानदार स्कूटर्स, पाहा टॉप 5 गाड्या

सिंगल चार्जमध्ये 150KM रेंज, One-Moto ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च

(Tesla to recall 475,000 cars rear camera connection issue)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें