AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या वर्षात Tata, Maruti आणि Volkswagen च्या गाड्या महागणार, जाणून घ्या कारणं

कोरोना या साथरोगामुळे जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्यां मोठा फटका सहन करत आहेत. आधी अचानक उत्पादन बंद झाल्यामुळे नुकसान झाले आणि नंतर ते पूर्ववत झाल्यावर सेमीकंडक्टरसारख्या उत्पादनांच्या कमतरतेमुळे उत्पादन थांबले.

नव्या वर्षात Tata, Maruti आणि Volkswagen च्या गाड्या महागणार, जाणून घ्या कारणं
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 31, 2021 | 11:48 AM
Share

मुंबई : कोरोना या साथरोगामुळे जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्या मोठा फटका सहन करत आहेत. आधी अचानक उत्पादन बंद झाल्यामुळे नुकसान झाले आणि नंतर ते पूर्ववत झाल्यावर सेमीकंडक्टरसारख्या उत्पादनांच्या कमतरतेमुळे उत्पादन थांबले. कच्चा माल, इतर पार्ट्स आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे आपल्या देशातील कार निर्मात्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा पर्याय निवडला आहे. 2022 च्या जानेवारीपासून वाहनांच्या किमतीतील पुन्हा एकदा वाढ केली जात आहे. (Tata Motors, Maruti Suzuki and Volkswagen cars will become more expensive in new year)

भारतीय ऑटोमोबाईल कंपन्या बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. सेमीकंडक्टर चिप्सची खरेदी आणि इनपुट मटेरियलच्या कमतरतेमुळे नवीन वाहनांचे उत्पादन मंदावले आहे. या सर्व समस्यांनी वाहन कंपन्या त्रस्त आहेत, त्यामुळे वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी वाहन निर्मात्या कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे.

मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार

मारुती सुझुकीने अलीकडेच स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे की, ते 1 जानेवारी 2022 पासून किमती वाढवतील. ऑटोमेकरने 2021 मध्ये आपल्या वाहनांच्या किमतीत 4.9% ने वाढ केली आहे. या कंपनीच्या वाहनांच्या किमती जानेवारीमध्ये प्रथम 1.4 टक्के, नंतर एप्रिलमध्ये 1.6 टक्के आणि शेवटी सप्टेंबरमध्ये 1.9 टक्क्यांनी वाढल्या.

मारुतीने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, “गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे, कंपनीसाठी हे अत्यावश्यक बनले आहे की ग्राहकांवर अतिरिक्त खर्चाचा काही भार देऊन तोटा भरुन काढला जाईल.

टाटा मोटर्सही किंमती वाढवणार

देशातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सनेही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. जानेवारी महिन्यात कंपनीच्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत बदल दिसून येतील. ही वाढ अंदाजे 2.5% इतकी आहे. ही घोषणा नुकतीच करण्यात आली असताना, टाटाने आधीच त्यांच्या फ्लॅगशिप SUV, सफारीच्या किमती ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 7,000 रुपयांनी वाढवल्या होत्या.

टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल्स बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले, “कच्च्या मालाच्या किमती आणि इतर इनपुट कॉस्ट वाढतच आहेत. वाढत्या किंमतीच्या परिणामावर मात करण्यासाठी कंपनीला जानेवारी 2022 पासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवणे भाग पडले आहे.

फोक्सवॅगनचा दरवाढीचा निर्णय

फोक्सवॅगनने गुरुवारी जाहीर केले की, ते नवीन वर्षात 1 जानेवारीपासून पोलो, व्हेंटो आणि मध्यम आकाराच्या एसयूव्ही टायगुनच्या किमती वाढवणार आहेत. फॉक्सवॅगन आता अशा कार निर्मात्यांपैकी एक आहे ज्यांनी जानेवारीपासून दरवाढीची पुष्टी केली आहे. देशातील इतर अनेक ब्रँड्सप्रमाणे, फोक्सवॅगनने वाढत्या इनपुट्स आणि ऑपरेशनल कॉस्टमुळे किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मॉडेल आणि निवडलेल्या व्हेरिएंटवर अवलंबून किंमत वाढ 2% ते 5% दरम्यान असेल. फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले की, “इनपुट आणि ऑपरेशनल खर्चात भरीव वाढ झाल्यामुळे, आम्ही आमच्या उत्पादनांच्या किमती 2% ते 5% ने वाढवण्याचा आणि ग्राहकांवर होणारा परिणाम कमीत कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.” आमचा ब्रँड, उत्पादने आणि सेवा अधिक सुलभ बनवण्याचा आणि फोक्सवॅगनला आमच्या ग्राहकांमध्ये पसंतीचा ब्रँड म्हणून स्थापित करण्याचा आमचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न आहे.”

इतर बातम्या

भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या, जाणून घ्या टॉप 5 कार्सच्या किंमती आणि फीचर्स

Yamaha Aerox 155 ते TVS Jupiter 125, 2021 मध्ये लॉन्च झाल्या शानदार स्कूटर्स, पाहा टॉप 5 गाड्या

सिंगल चार्जमध्ये 150KM रेंज, One-Moto ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च

(Tata Motors, Maruti Suzuki and Volkswagen cars will become more expensive in new year)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?