TATA Moters : नेक्‍स्‍ट-जनरेशन मो‍बिलिटी सोल्‍यूशन्‍सचे प्रदर्शन, 7 नाविन्यपूर्ण, टॉप-ऑफ-द लाइन वाहने सादर

प्रवास 3.0 मधील 'सुरक्षित, स्‍मार्ट व शाश्‍वत प्रवासी गतीलशीलतेकडे वाटचाल' या थीमशी संलग्‍न आहे. टाटा मोटर्स शेवटच्‍या मैलापर्यंत आणि लांब पल्‍ल्‍याच्‍या प्रवासी गतीशीलता दाखवणार आहे. अधिक जाणून घ्या...

TATA Moters : नेक्‍स्‍ट-जनरेशन मो‍बिलिटी सोल्‍यूशन्‍सचे प्रदर्शन, 7 नाविन्यपूर्ण, टॉप-ऑफ-द लाइन वाहने सादर
नेक्‍स्‍ट-जनरेशन मो‍बिलिटी सोल्‍यूशन्‍सचे प्रदर्शनImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 6:07 AM

मुंबई :  टाटा मोटर्स (TATA Moters) ही भरतातील (India) सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक आणि देशातील अग्रणी प्रवासी व्‍यावसायिक गतीशीलता कंपनी प्रवास 3.0 मध्‍ये सात अत्‍याधुनिक मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स सादर करत आहे. हैदराबादमध्‍ये भारतातील प्रमुख बस व कार (Car) ट्रॅव्‍हल शोच्‍या तिस-या पर्वामध्‍ये टाटा मोटर्स विविध इंधन पर्यायांमधील प्रवासी व्‍यावसायिक वाहनांचा प्रबळ उत्‍पादन पोर्टफोलिओ दाखवणार आहे. प्रवास 3.0 मधील ‘सुरक्षित, स्‍मार्ट व शाश्‍वत प्रवासी गतीलशीलतेकडे वाटचाल’ या थीमशी संलग्‍न राहत टाटा मोटर्स शेवटच्‍या मैलापर्यंत आणि लांब पल्‍ल्‍याच्‍या प्रवासी गतीशीलता गरजांसाठी आधुनिक व स्थिर सोल्‍यूशन्‍स दाखवणार आहे. याप्रसंगी बोलताना टाटा मोटर्सच्‍या प्रॉडक्‍ट लाइन – बसेसचे उपाध्‍यक्ष श्री. रोहित श्रीवास्‍तव म्‍हणाले, ”टाटा मोटर्सला प्रवासच्‍या नवीन पर्वामध्‍ये सहभाग घेण्‍याचा आनंद होत आहे. हे नवीन उत्‍पादने व तंत्रज्ञान दाखवण्‍यासाठी, तसेच या विभागामधील ऑपरेटर्स, व्‍यवसाय अभ्‍यागत व इतर भागधारकांमधील सखोल सहयोगासाठी क्षमता देण्‍यासाठी सर्वोत्तम व्‍यासपीठ म्‍हणून उदयास आले आहे.’

पुढे बोलताना श्रीवास्तव म्हणाले की,  ‘यंदाची थीम शाश्‍वतपूर्ण परिवहनाला वास्‍तविकता बनवण्‍यासाठी उदयोन्‍मुख तंत्रज्ञान व नवोन्‍मेष्‍काराचा वापर करण्‍याच्‍या गरजेला दाखवते. उद्योगातील अग्रणी म्‍हणून टाटा मोटर्स या दृष्टीकोनाशी नेहमीच संलग्‍न राहिली आहे आणि आमच्‍या उत्‍पादनांची वैविध्‍यपूर्ण व स्‍मार्ट श्रेणी विविध शुद्ध इंधन पर्यायांसह येते, ज्‍यामध्‍ये सुरक्षितता, आरामदायीपणा व कार्यक्षमतेची खात्री मिळते.’

प्रवास 3.0 मध्‍ये टाटा मोटर्सच्‍या वाहन श्रेणीमध्‍ये इंटरसिटी व लक्‍झरी प्रवासासाठी भारतातील पहिली फ्रण्‍ट इंजिन 13.5 मीटर बस – मॅग्‍ना स्‍लीपर कोचचा समावेश आहे. प्रदर्शनामधील पर्यायी-इंधन-संचालित वाहनांमध्‍ये विशेषत: कर्मचारी परिवहनासाठी डिझाइन करण्‍यात आलेली 9/9 अल्‍ट्रा इलेक्ट्रिक बस, 913 लॉंग रेंज सीएनजी बस आणि एलपीओ 10.2 सीएनजी एसी स्‍कूल बस यांचा समावेश आहे. प्रदर्शनामध्‍ये सानुकूल कारवॉंसह आधुनिक सुविधांचा देखील समावेश आहे, जे लक्‍झरीअस आरामदायी प्रवासासाठी अनुकूल आहेत. शेवटच्‍या मैलापर्यंत प्रवासी परिवहनासाठी अनुकूल आयकॉनिक विंगर 9एस व मॅजिक एक्‍स्‍प्रेसमध्‍ये एर्गोनॉमिक सीटिंग डिझाइन्‍स व एैसपैस व्‍यवस्‍थांसह ड्रायव्‍हर व प्रवाशांसाठी अद्वितीय आरामदायीपणा आहे. प्रदर्शित करण्‍यात आलेले प्रत्‍येक उत्‍पादन कमी कार्यसंचालन खर्चासह उच्‍च कार्यक्षमता व लाभदायी क्षमतेची खात्री देतात.

टाटा मोटर्स भविष्‍यासाठी शुद्ध व शाश्‍वतपूर्ण गतीशीलता सोल्‍यूशन्‍सच्‍या दृष्टीकोनाप्रती कटिबद्ध आहे. कंपनीने पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला चालना देण्‍यासाठी निर्णयात्‍मक पावले उचलली आहेत. नुकतेच उचलण्‍यात आलेले पाऊल म्‍हणजे हायड्रोजन फ्यूएल सेल तंत्रज्ञानाची अंमलबजावणी. कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून 15 हायड्रोजन फ्यूएल सेल बसेससाठी ऑर्डर मिळवणारी पहिली भारतीय वाहन उत्‍पादक आहे. बॅटरी इलेक्ट्रिक गतीशीलतेसंदर्भात टाटा मोटर्स बाजारपेठ अग्रणी असून देशाच्‍या विविध शहरांमध्‍ये 715 हून अधिक टाटा मोटर्सच्‍या ई-बसेस वितरित केल्‍या आहेत आणि या बसेसनी एकूण ४० दशलक्षहून अधिक किलोमीटर प्रवास केला आहे. कंपनी विभागांमध्‍ये सीएनजी बसेससाठी व्‍यापक श्रेणी देखील देते, ज्‍यामधून ऑपरेटर्सना कमी कार्यसंचालन खर्च व उच्‍च नफ्याची खात्री मिळते.

टाटा मोटर्सची प्रवासी व्‍यावसायिक वाहन श्रेणी सानुकूल फ्लीट व्‍यवस्‍थापनासाठी टाटा मोटर्सचे नेक्‍स्ट-जनरेशन डिजिटल सोल्‍यूशन फ्लीट एजच्‍या प्रमाणित फिटमेंटसह येते. फ्लीट एज ग्राहकांना एण्‍ड-टू-एण्‍ड कनेक्‍टेड अनुभवासह त्‍यांच्‍या संपूर्ण व्‍यवसाय कार्यसंचालनांवर सर्वोत्तम नियंत्रण देते.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.