डार्क थीममुळे TATA Nexon EV Max चं रुपडं पालटलं, काय आहे खासियत जाणून घ्या

टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपली नवी नेक्सन इव्ही लाँच केली आहे. डार्क एडिशनमध्ये ही गाडी लाँच करण्यात आली आहे. जबरदस्त फीचर्ससह ही गाडी सादर करण्यात आली आहे. एक्टटीरियर आणि इंटीरियरमध्ये काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.

डार्क थीममुळे TATA Nexon EV Max चं रुपडं पालटलं, काय आहे खासियत जाणून घ्या
Tata Nexon EV Max Dark Edition : टाटा नेक्सन इव्ही मॅक्स इलेक्ट्रिक कारचं डार्क एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Image Credit source: TATA MOTORS
| Updated on: Apr 19, 2023 | 10:25 PM

मुंबई : टाटा मोटर्स कंपनीने भारतीय बाजारात नेक्सन इव्ही मॅक्सच डार्क एडिशन लाँच केलं आहे. हाय टेक इन्‍फोटेन्‍मेंट अपग्रेडसह सुधारित नेक्‍सॉन इव्‍ही मॅक्‍स डार्क ही सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांनी युक्‍त नेक्सॉन लाइन अपमधील पहिली गाडी असेल. देशभरातील ग्राहकांसाठी 7.2 kW एसी फास्‍ट चार्जरसह एक्सझेड+ लक्‍स आणि एक्सझेड+ लक्‍स या दोन ट्रिम्‍समध्‍ये ही गाडी उपलब्‍ध असेल. या गाडीत 7.2 किलोव्हॅटचं होम चार्जर असेल. ही कारची बॅटरी पाच ते सहा तासात चार्ज करू शकते. 7.2 kW एसी फास्‍ट चार्जरसह एक्सझेड+ लक्‍स या गाडीची किंमत (19.54 लाख एक्स शोरुम) आणि एक्सझेड+ लक्‍स या गाडीची किंमत (19.04 लाख एक्स शोरुम) आहे.

गाडीचे फीचर्स

हार्मनची 26.03 सेमी (10.25 इंच) टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, हाय रिझॉल्‍यूशन (1920X720) हाय डेफिनिशन (एचडी) डिस्‍प्‍लेसह स्लिक रिस्‍पॉन्‍स, वायफायवर अँड्रॉईड ऑटो व अ‍ॅप्पल कारप्‍ले, हाय डेफिनिशन रिअर व्‍ह्यू कॅमेरा, एन्‍हान्‍स्‍ड ऑडीओ परफॉर्मन्‍ससह शार्प नोट्स आणि विस्‍तारित बास परफॉर्मन्‍स,  6 प्रादेशिक भाषांमध्‍ये (इंग्रजी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, मराठी) वॉईस असिस्‍टण्‍ट आणि नवीन युजर इंटरफेस (यूआय) यात आहे.

गाडीचं इंटेरियर आणि एक्स्टीरिअर

या गाडीचं एक्‍स्‍टीरिअर व इंटीरिअर हे खास आकर्षण असणार आहे. सिग्‍नेचर मिडनाइट ब्‍लॅक कलर्ड बॉडीला साजेसे स्‍टायलिश चारकोल ग्रे अलॉई व्‍हील्‍स, सॅटिन ब्‍लॅक ह्युमॅनिटी लाइन, प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍ससह ट्रा-अ‍ॅरो डीआरएल, ट्रा-अ‍ॅरो सिग्‍नेचर एलईडी टेल लॅम्‍प्‍स, फेण्‍डरवर एक्‍सक्‍लुसिव्‍ह DARK मास्‍कट, एक्‍स्‍टीरिअरवर शार्क फिन अ‍ॅण्‍टेना व रूफ रेल्‍स अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असतील.

इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्‍ड, फ्रण्‍ट लेदरेट वेण्टिलेटेड सीट्स, एअर प्‍युरिफायरसह एक्‍यूआय डिस्‍प्‍ले, वायरलेस स्‍मार्टफोन चार्जर, क्रूझ कंट्रोल, ऑटो डिमिंग आयआरव्‍हीएम, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटो हेडलॅम्‍प्‍स, रेन सेन्सिंग वायपर, फुली ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल, कूल्‍ड ग्लोव्‍हबॉक्‍स, रिअर एसी वेण्‍ट्स, स्‍मार्ट की सह पुश बटन स्‍टार्ट/स्‍टॉप (पीईपीएस) यात आहे.

त्याचबरोबर इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओआरव्हीएमएससह ऑटो फोल्‍ड, रिअर वायपर वॉशर व डिफॉगर, 4 स्‍पीकर + 4 ट्विटर्स, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्स आणि 17.78 सेमी (7 इंच) टीएफटी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्‍लस्‍टरसह फुल ग्राफिक डिस्‍प्‍ले ही काही नवीन सुधारित फीचर्स आहेत.

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख विवेक श्रीवत्‍स यांनी सांगितलं की, ‘‘नेक्‍सॉन इव्‍ही ही भारतातील पहिल्‍या क्रमांकाची ईव्‍ही आहे आणि अल्‍पावधीत 50 हजाराहून अधिक ग्राहकांमध्‍ये लोकप्रिय ठरली आहे. नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍सच्‍या लोकप्रियतेसह आम्‍हाला वाटलं की, नवीन अवतार ग्राहकांसाठी सादर करायची हीच योग्‍य वेळ आहे.’’