टाटा मोटर्सची ‘सीएनजी’त एन्ट्री: ऑटो मोड ते लीक डिटेक्शन; दमदार फीचर्ससह कार बाजारात

टाटा मोटर्सची ‘सीएनजी’त एन्ट्री: ऑटो मोड ते लीक डिटेक्शन; दमदार फीचर्ससह कार बाजारात

टाटा मोटर्सची ‘सीएनजी’त एन्ट्री:  ऑटो मोड ते लीक डिटेक्शन; दमदार फीचर्ससह कार बाजारात
टाटा मोटर्सची ‘सीएनजी’त एन्ट्री
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 9:51 AM

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने (TATA MOTORS) प्रदीर्घ काळानंतर सीएनजी सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये भागीदारीत वाढ करण्यासाठी कंपनीने TIGAO आणि TIGOR ला सीएनजी व्हेरियंटमध्ये सादर केले आहे. टाटा मोटर्सने सीएनजी गाड्यांमध्ये विशेष फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध सीएनजी गाड्यांवर वरचढ ठरण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला सीएनजी गाड्या खरेदीकडे कल वाढीस लागला आहे. मात्र, पेट्रोल व डिझेल गाड्यांच्या तुलनेत असलेल्या सीएनजीच्या कामगिरीबाबत सर्वत्र साशंकता व्यक्त केली जात आहे. टाटा मोटर्सच्या रिसर्च विंगने यावर मोठ्या प्रमाणात काम केले. टाटाच्या दोन्ही गाड्या पेट्रोल मोडवर शिफ्ट केल्याविना डोंगराळ तसेच घाट रस्ता सहज पार करू शकतात.

सीएनजी मोडवर स्टार्ट

सध्या सीएनजी गाड्यांबाबत सर्वात महत्वाची समस्या म्हणजे स्टार्ट केल्यावर सुरुवातीला पेट्रोलवर चालते. त्यानंतर सीएनजी मोडवर शिफ्ट करावे लागतात. टाटा मोटर्सने दोन्ही सीएनजी व्हेरियंटमध्ये ही अडचण दूर केली आहे. दोन्ही गाड्या स्टार्ट केल्यावर थेट सीएनजी मोडवर चालतील. त्यामुळे पेट्रोल नंतर सीएनजी असा बदल करावा लागणार नाही.

ऑटो मोड चेंज

टाटा मोटर्सच्या सीएनजी कारचे वैशिष्ट्य ऑटो शिफ्ट आहे. त्यामुळे गाडीतील सीएनजी संपण्यापूर्वीच सिग्नल दिला जाईल. गाडी पेट्रोल मोडमध्ये शिफ्ट होईल. सुरक्षितता आणि कामगिरी या दोन्हींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. सीएनजी किटमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्यामुळे गॅस लीक होण्याचा धोका टळणार आहे. कंपनीने दोन्ही गाड्यांत लीक डिटेक्शन आणि थर्मल प्रोटेक्शन सारखे फीचर्स उपलब्ध केले आहेत.

सीएनजी गाड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी गाड्या खरेदीकडे कल दिसून येत आहे. देशातील विविध शहरांत सीएनजी पंपांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे इको-फ्रेंडली वाहनांना ग्राहक मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवित आहेत.

गाडीची किंमत किती?

Tiago CNG चार स्ट्रिम्स आणि Tigor CNG दोन स्ट्रिम्स मध्ये बाजारात आणल्या आहेत. Tiago CNG ची एक्स-शोरुम किंमत 6.09 लाखांपासून 7.52 लाखांच्या दरम्यान आहे. तर Tigor CNG ची एक्स-शोरुम किंमतीला 7.69 लाख रुपयांपासून सुरुवात होते.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी

ट्रिपल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरसह Realme 9i भारतात लाँच, किंमत…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.