‘या’ कारणामुळे टेस्लाच्या गाड्यांवर चिनी लष्कराकडून बंदी

भारतीयांना टेस्लाच्या कार्सची प्रतीक्षा आहे, असे असतानाच भारताच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये टेस्लाबाबत वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

'या' कारणामुळे टेस्लाच्या गाड्यांवर चिनी लष्कराकडून बंदी
Tesla electric Cars
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 6:07 PM

बीजिंग : जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची (Tesla) नुकतीच भारतात एन्ट्री झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. त्यामुळे अनेक भारतीयांना टेस्लाच्या कार्सची प्रतीक्षा आहे. असे असतानाच भारताच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये टेस्लाबाबत वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. तिथल्या लष्कराने टेस्लाच्या गाड्यांवर बंदी घातली आहे. टेस्लाच्या गाड्यांमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका असल्याचे तिथल्या लष्कराने नमूद केलं आहे. (Tesla electric Cars banned by Chinese military over camera concerns)

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चीन जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. टेस्लाचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. परंतु टेस्लाच्या वाहनांविषयी चिनी सैन्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. चिनी सैन्याने आपल्या कंपाऊंड व कॉम्प्लेक्समध्ये टेस्ला वाहनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार असे सांगितले जात आहे की, टेस्ला वाहनांच्या गोपनीयतेबाबत चिनी सैन्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

चीनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

या अहवालात असे सांगितले गेले आहे की टेस्ला कंपनी कारमधील कॅमेऱ्याद्वारे डेटा गोळा करीत असल्याचा चीनी लष्कराला संशय आहे. हा डेटा चीनी सरकारच्या नियंत्रणाखाली नाही. अशा परिस्थितीत हे प्रकरण लष्करासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. आता मिलिट्री हाऊसिंग कॉम्प्लेक्सला सांगितले आहे की प्रत्येकजण (ज्यांच्याकडे टेस्ला ईव्ही आहे असे सर्वजण) त्यांच्या टेस्ला ईव्हीला सैन्यापासून दूर ठेवतील, कारण लष्करासंबंधीची माहिती लीक झाल्यास, त्याने देशाला खूप मोठा धोका पत्करावा लागू शकतो.

टेस्लाचा कॅमेरा गोपनीय माहिती मिळवू शकतो?

टेस्ला वाहने बऱ्याच कॅमेर्‍यांनी सज्ज आहेत, जी कार मालकास मार्गदर्शक पार्किंग, ऑटोपायलट आणि सेल्फ-ड्रायव्हिंग फंक्शनिंगमध्ये मदत करतात. टेस्लाच्या बर्‍याच वाहनांमध्ये सेंट्री मोड देखील आहे. तथापि, मॉडेल 3 टेस्लाची सर्वात प्रसिद्ध आवृत्ती मानली जाते. कंपनीकडून हे सर्वात किफायतशीर वाहन मानले जाते. शांघायमध्ये या वाहनाचे स्थानिक उत्पादन सुरू झाल्यापासून त्याची विक्री अधिक वाढली आहे. पण आता चिनी लष्कराने निर्माण केलेल्या प्रश्नांनंतर असं म्हटलं जातंय की, टेस्लाचा जो इंटर्नला कॅमेरा आहे, तो गोपनीय माहिती मिळवू (अॅक्सेस करु शकतो) शकतो. अशा परिस्थितीत कंपनीने म्हटलं आहे की, इन कार कॅम्स टेस्लाच्या गाड्यांमध्ये काम करत नाहीत.

संबंधित बातम्या

टेस्ला मोटर्सचा भारतात मोठा प्लॅन, ‘या’ राज्यात सुरू करणार उत्पादन केंद्र

‘ही’ असेल Tesla ची भारतातील पहिली कार, कंपनी गुजरातमध्ये कामकाज सुरु करणार?

(Tesla electric Cars banned by Chinese military over camera concerns)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.