CNG कारमध्ये Maruti कंपनीच्या या कारचा दबदबा,विक्रीने नवा रेकॉर्ड मोडला, थेट 139 टक्के वाढ
भारतीय बाजारात सीएनजी कारची मागणी दरवर्षी वाढतच चालली आहे. पेट्रोल आणि डिझेल महागल्याने आता ग्राहकांचा ओढा सीएनजी कारकडे असताना मारुतीच्या या सीएनजी कारने विक्रीचा रेकॉर्ड तोडला आहे.

सीएनजी कारना भारतीय बाजारात मोठी मागणी होत आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये अनेक कंपन्यानी १.२४ लाख सीएनजी कार विकल्या आहेत. सेगमेंट इयर ऑन २१.३ टक्के वाढले आहे. नेहमी सारखे मारुती सुझुकी सीएनजीच्या या सेगमेंटमध्ये जास्त कार विकणारा ब्रँड बनला आहे. अलिकडेच लाँच झालेली मारुतीची सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट सीएनजी कारची विक्रीत वाढ झाली आहे. हा सेगमेंटमध्ये सर्वात जास्त ग्रोथ करणारी ही कार आहे. टॉप सेलिंग सीएनजी कारच्या यादीत ब्रेझा पाचव्या क्रमांकावर आहे.
ऑक्टोबर महिन्यात कंपनीने ब्रेझाच्या ८,७२५ युनिट् विकल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रेझा सीएनजीच्या केवळ ३,६५७ युनिट्स विकल्या होत्या. दरवर्षी कंपनीच्या सेल्समध्ये १३९ टक्के वाढ झाली आहे. अलिकडेच मारुती सुझुकीने याचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे.
भारतीय बाजारात सीएनजी कारची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशात 1.02 लाख सीएनजी कारची विक्री झाली होती. यंदा ऑक्टोबरमध्ये हा आकडा वाढून 1.24 लाखांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 21,859 सीएनजी कारची अधिक विक्री झाली आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या सीएनजी कारच्या यादीत मारुती सुझुकीचे वर्चस्व कायम आहे. ऑक्टोबरमध्ये मारुती सुझुकीने सर्वाधिक 83,539 सीएनजी कारची विक्री केली. तर टाटा मोटर्सने 19,978 कार विकून दुसरे आणि हुंडईने 12,386 कार विकून तिसरे स्थान पटकावले.
ब्रेझा सीएनजी फेसलिफ्टमध्ये नवे काय?
मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट सीएनजीच्या इंजिनमध्ये कोणताही यांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. या कारमध्ये पूर्वीप्रमाणेच 1.5 लिटरचे पेट्रोल-सीएनजी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 86 ते 89 बीएचपी पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.
ब्रेझाच्या फेसलिफ्टमधील सर्वात महत्त्वाचा बदल सीएनजी टँकच्या रचनेत करण्यात आला आहे. आता ब्रेझा सीएनजीमध्ये अंडरबॉडी सीएनजी टँक देण्यात आला आहे. त्यामुळे कारच्या डिक्कीत 328 लिटरची मोठी जागा उपलब्ध होते. यामुळे सामान ठेवण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध झाली आहे.
ब्रेझा कारला सुरक्षेच्या बाबतीत भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यामध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत.
किती आहे किंमत?
मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
– LXi CNG
– VXi CNG
– ZXi CNG
ब्रेझा सीएनजीची एक्स-शोरूम किंमत 9.45 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 11.80 लाख रुपयांपर्यंत जाते