Devendra Fadnavis: संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना लक्ष्य; देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचा इतिहासच काढला, आणीबाणीचा दाखला देत हल्लाबोल
Devendra Fadnavis Targets Congress: देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना सवाल केला आहे. संविधानाच्या रंगापासून आणीबाणीपर्यंत अनेक मुद्द्यांवरून घेरल्याचे दिसून आले आहे.

आज बेळगावमध्ये संविधान वाचवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. तसेच विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांना महाराष्ट्रात नेपाळ आणि बांग्लादेशासारखी परिस्थिती हवी आहे. असं ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांना भारतात अराजकता निर्माण करायची आहे. विरोधकांना रेजीम बदलायची आहे. त्यांना भारतात सरकार नाही तर व्यवस्था बदलायची आहे. संविधान संपवून नवीन रेजीम त्यांना आणायचं आहे. आजची लढाई तू तू मे मे ची नाही आहे. राहुल गांधी वारंवार खोटं बोलत आहेत. ते रोज नवं खोटं बोलतात ही त्यांनी रणनीती आहे. रोज खोटं बोलल्याने लोकांना ते खरं वाटेल असं राहुल गांधींना वाटतं, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी गाधींवर टीका केली आहे.
ते म्हणाले की, 70 वर्ष कॉंग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला आहे. पण भारताने 12 वर्षात 50 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. कॉंग्रेसच्या काळात लोकांना 2 वेळचं जेवण मिळत नव्हतं. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत जाणारी असल्याचे IMF ने म्हटलं आहे. जगातील सर्वात शक्तीशाली तिसरा देश भारत आहे. वर्ल्ड बँकेनेही भारताची दखल घेतली आहे. 2027 मध्ये विकसित भारत करु, असा नरेंद्र मोदींचा निर्धार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी लाल संविधान घेऊन फिरतात. पण संसदेतील संविधानाची प्रत निळ्या रंगात आहे. राहुल गांधी संविधानिक व्यक्ती आणि संस्थांचा अपमान करत आहेत. कॉंग्रेसने संविधान आणि संविधानिक पदाचा कधी, सन्मान केला नाही. राहुल गांधी लेफ्टकडे वळत आहेत. कॉंग्रेसने पीएमपद संविधानाच्या चौकटीतून बाहेर काढलं आहे. कॉंग्रेसने आणीबाणी लावून नेत्यांना जेलमध्ये टाकलं होतं. आम्ही संविधानाच्या वर आहोत अशी कॉंग्रेसची भावना आहे.
ते पुढे म्हणाले की, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पेटीशन फाईल झाली होती. 1975 साली इंदिरा गांधीविरोधात निवडणुकीवरून केस झाली होती. संविधानातील मुलभूत अधिकार महत्त्वाचे असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सर्वात मोठा अपमान कॉंग्रेसने केला आहे. भाजपनं कधी संविधान बदललं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
