Aditya Dhar : “मी यामी पगलू!” पत्नी यामी गौतमच्या वाढदिवशी आदित्य धरची खास पोस्ट; म्हणाला, “तू माझं संपूर्ण….
खास दिवशी तिचा पती आणि दिग्दर्शक आदित्य धर याने सोशल मीडियावर तिच्यासाठी एक प्रेमळ पोस्ट शेअर केली आहे. यामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने तिचं भरभरून कौतुक केलं. विशेष म्हणजे

अभिनेत्री यामी गौतम आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिचा पती आणि दिग्दर्शक आदित्य धर याने सोशल मीडियावर तिच्यासाठी एक प्रेमळ पोस्ट शेअर केली आहे. यामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने तिचं भरभरून कौतुक केलं. विशेष म्हणजे पोस्टच्या शेवटी त्याने स्वत:ला 'यामी पगलू' असं म्हटलं आहे.
- अभिनेत्री यामी गौतम आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिचा पती आणि दिग्दर्शक आदित्य धर याने सोशल मीडियावर तिच्यासाठी एक प्रेमळ पोस्ट शेअर केली आहे. यामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने तिचं भरभरून कौतुक केलं. विशेष म्हणजे पोस्टच्या शेवटी त्याने स्वत:ला ‘यामी पगलू’ असं म्हटलं आहे.
- आदित्य धरने इन्स्टाग्रामवर यामीसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्या सुट्टीतील काही क्षण पाहायला मिळतात काही फोटोंमध्ये ते एकत्र फिरताना, तर काही फोटोंमध्ये एका कपड्यांच्या दुकानातून बाहेर पडताना दिसत आहेत. या फोटोंसोबत आदित्यने यामीसाठी खास संदेशही लिहिला आहे.
- वाढदिवसाच्या शुभेच्छा यामी! मी आजवर पाहिलेली सर्वात सुंदर स्त्री तू आहेस. तुझं हसू केवळ एखादी खोलीच नाही. तर माझं संपूर्ण जग उजळून टाकतं. तू माझं घर आहेस, माझी सर्वात मोठी ताकद आहेस आणि मला नेहमी पाठिंबा देणारी व्यक्ती आहेस, आज मी जो काही आहे. तो होण्यात तुझा मोठा वाटा आहे. अशा भावना आदित्यने व्यक्त केल्या.
- पुढे त्याने यामीच्या कुटुंबाप्रती असलेल्या प्रेमाचं आणि कामाप्रती असलेल्या समर्पणाचही कौतुक केलं. कुटुंबाला भरभरून प्रेम देतानाच ती आपल्या कामासाठीही तितकीच मेहनत घेते, हे पाहून आपल्याला दररोज आश्चर्य वाटतं असं त्याने म्हटलं. एवढं सगळं सांभाळूनही तू मला कसं काय सहन करतेस असा मिश्किल प्रश्नही त्याने पोस्टमध्ये विचारला.
- यामीने अशीच स्वप्न पाहत राहावीत. चमकत राहावं आणि तिच्या आयुष्यात तिने इतरांना दिलेल्या प्रेमाच्या कितीतरी पटीने आनंद आणी आशीर्वाद परत मिळावेत, अशी शुभेच्छाही त्याने दिली. आयुष्यभर तिचा हात हातात धरून तिला प्रोत्साहन देत राहण्याचं आणि पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडत राहण्याचं वचनही आदित्यने दिलं . शेवटी त्याने #yamipaglu हा हॅशटॅग वापरला.
- आदित्य धर आणि यामी गौतम यांची पहिली भेट 2019 मध्ये उरी : द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या सेटवर झाली. पुढे त्याचं मैत्रीत रूपांतर झालं. 4 जून 2021 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.
Follow Us






