डबल सीएनजी सिलिंडर सोबत येत आहे ही 7 सिटर कार, सोबत टर्बो इंजिनाची ताकद

नव्या Renault Triber कारमध्ये लवकरच मोठा अपडेट मिळणार आहे. यात नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येणार असून जे जास्त पॉवर आणि चांगला परफॉर्मन्स देईल. तसेच कंपनी फॅक्ट्री-फिटेड ड्युअल सीएनजी टँक सेटअप देखील सादर करु शकते. ज्याने मायलेज चांगला होईल आणि बुट स्पेसवर देखील परिणाम होणार नाही.

डबल सीएनजी सिलिंडर सोबत येत आहे ही 7 सिटर कार, सोबत टर्बो इंजिनाची ताकद
MPV Renault Triber
| Updated on: Apr 21, 2026 | 4:24 PM

फ्रान्सची कार कंपनी रेनोने भारतात आपल्या लोकप्रिय MPV Renault Triber कारच्या बाबतीत मोठे अपडेट देण्याची तयारी केली आहे. बातमी ही आली आहे की नवीन ट्रायबर लवकरच जास्त पॉवरफुल इंजिन आणि नव्या सीएनजी सेटअपमध्ये पाहायला मिळू शकते.कंपनीने अलिकडेच चेन्नईत एका इव्हेंट दरम्यान आपले नवीन RGEP ( रेनो ग्रुप एंट्री प्लॅटफॉर्म ) ला सादर केले, सध्याचा CMF-A प्लॅटफॉर्मचा अपडेटेड व्हर्जन आहे.

हा नवा प्लॅटफॉर्म Renault Kwid, Renault Kiger आणि Renault Triber सारख्या मॉडेल्ससाठी वापर केला जाईल. कंपनी या सर्व कारना मिड-लाईफ अपडेटसह या वर्ष अखेर किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करु शकते.
रेनोने भारतात आपला बिझनसला वाढवण्याचे एक मोठे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी २०३० पर्यंत भारतीय पॅसेंजर व्हेईकल मार्केटमध्ये ५ टक्के भागीदार मिळवून इच्छीते. यासाठी नवीन कार आणण्यासोबत सध्याच्या मॉडेल्सना देखील अपडेट केले जाणार आहे, ज्यात ट्रायबर एक महत्वाची भूमिका निभावेल.

नवी 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन

रेनो ट्रायबरला भारतात २०१९ मध्ये लाँच केले होते. ही कार तिची किफायतशीर किंमत, ७ – सिटर लेआऊट आणि चांगल्या स्पेसमुळे खूप लोकप्रिय राहिली आहे.

आता यात १ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते.जे मॅन्युअर आणि AMT गिअरबॉक्स सोबत येते. मात्र अनेक ग्राहकांची तक्रार राहिली आहे की हे इंजिन फुल लोडवर पर्याप्त पॉवर देत नाही.

या कमतरतेला दूर करण्यासाठी कंपनी आता यात नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्याची तयारी केली जाते. या नव्या इंजिनात सुमारे ९९ bhp ची पॉवर आणि १६० Nm चे टॉर्क देणार आहे. याला मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्स सोबत सादर केले जाऊ शकते. नवीन ट्रायबर या वर्षाच्या फेस्टीव्ह सिजनच्या आसपास लाँच होऊ शकते.

टर्बो इंजिन आणि ड्युअल CNG चे कॉम्बिनेशन

भारतात वाढत्या पेट्रोल- डिझेलच्या किंमती आणि कठोर नियमांमुळे सीएनजी कारची मागणी वेगाने वाढत आहे. सध्या रेनो ट्रायबरमध्ये डीलर- लेव्हलवर सीएनजी किट लावली जाते, जी केवळ मॅन्युअर गिअरबॉक्ससोबत उपलब्ध येते. आता कंपनी फॅक्ट्री – फिटेड सीएनजी व्हर्जन आणण्याची योजना तयार करत आहेत.

खास बाब ही होणार आहे की यात अंडरबॉडी ड्युअल – सीएनजी टँक सेटअप मिळेल, ज्यामुळे बुट स्पेस कमी होणार आहे. नवीन ट्रायबरमध्ये टर्बो पेट्रोल इंजिन सोबत ड्युअर – सीएनजीचे कॉम्बिनेश दिला जाऊ शकतो. यामुळे ग्राहकांन जास्त पॉवर आणि कमी रनिंग कॉस्ट सारखे दोन मोठे फायदे मिळू शकतात.

नवा प्लॅटफॉर्म देईल चांगले फिचर्स

नव्या RGEP प्लॅटफॉर्मवर तयार झालेल्या रेनो ट्रायबरमध्ये चांगली सेफ्टी, जास्त फिचर्स आणि चांगला ड्रायव्हींग एक्सपिरियन्स मिळण्याची आशा आहे. हा प्लॅटफॉर्म सीएनजी टँकला कारच्या खाली फिट करण्यासाठी डिझाईन केला आहे.ज्यामुळे कारची स्पेस आणि प्रॅक्टीकलिटी कायम राहते.

 

Follow Us