लाँच झाल्यानंतर चक्क 8 दिवसातच सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनची 8 हजार रूपयांनी वाढली ‍किंमत

सॅमसंगचा हा फोन 29 जून रोजी लाँच झाला होता आणि लाँच झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच या डिव्हाइसच्या किंमतीत तब्बल 8 हजार रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. हा फोन आता कंपनीच्या वेबसाइटवर आणि ॲमेझॉनवर नवीन किंमतीसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची दरवाढीनंतरची किंमत जाणून घेऊयात.

लाँच झाल्यानंतर चक्क 8 दिवसातच सॅमसंगच्या या स्मार्टफोनची 8 हजार रूपयांनी वाढली ‍किंमत
| Edited By: | Updated on: Jul 14, 2026 | 2:56 PM

सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन लाँच होत आहेत. अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यानी वाढत्या मेमरी चिपची कमतरता लक्षात घेत फोनच्या किमतीत वाढ केलेली आहे. अशातच सॅमसंग कंपनीने एम सीरीजमध्ये गॅलेक्सी एम47 5जी हा फोन 29 जून 2026 रोज नवीन फोन लाँच केला होता. मात्र आता असे वृत्त समोर येत आहे की कंपनीने लाँच झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच या फोनची किंमत 8 हजार रुपयांनी वाढवली आहे. तर लाँच वेळी हा फोन 25 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र अचानक 8 हजार रुपयांच्या दरवाढीनंतर हा 32 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या सॅमसंग फोनच्या दरवाढीनंतरची किंमत जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी एम47 5जी ची दरवाढीनंतरची नवीन किंमत

स्मार्टफोन निर्मात्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 25 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, पण आता दरवाढीनंतर हा फोन 32 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 28 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, पण आता त्याच्या किंमतीत वाढ झाल्याने हा फोन तुम्ही 36 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता.

8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 33 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. किंमत वाढीनंतर, हा व्हेरिएंट आता 41 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आणि ॲमेझॉनवर नवीन किंमतीसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सॅमसंगचा हा नवीन फोन या किंमत श्रेणीतील विवो, ओप्पो आणि रेडमी ब्रँडच्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम47 5जी वैशिष्ट्ये

स्क्रीन: या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंचाचा फुल एचडी+ फ्लॅट सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टसचा वापर केला जातो.

प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6th जनरेशन 3 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी ॲड्रेनो 710 जीपीयू आहे.

कॅमेरा सेटअप: मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच, समोरच्या बाजूस 12-मेगापिक्सलचा सेन्सर आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 45 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Follow Us