Vehicle Tyres : देशातील सर्वात दमदार टायर… भारत सरकारकडून मिळाले 5 स्टार रेटिंग

AIS च्या दाव्यानुसार, 5 स्टार रेटिंग असलेल्या टायरचा वापर केल्यानं इंधनाचा खपामध्ये 9.5 टक्केपर्यंत कमतरता येण्याची शक्यता आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनमध्येही कमी येणार आहे. 5 स्टार रेटिंगच्या टायरचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जनमध्ये 750kg ची सरासरी कमी होणार आहे.

Vehicle Tyres : देशातील सर्वात दमदार टायर... भारत सरकारकडून मिळाले 5 स्टार रेटिंग
दमदार टायर
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 1:59 PM

मुंबई :  कोणतीही गाडी चालवत असताना गाडीची सर्व मदार ही तिच्या टायरांवर (Tyres) असते. त्यामुळे प्रवास करताना सर्वात आधी चालक टायरची स्थिती कशी आहे, हे आवर्जून पाहत असतो. जर टायर खराब असतील तर, दुर्घटना घडण्याची शक्यता अनेक पटींनी वाढून जाते. टायर खराब असतील तर यातून इंजिनवर खूप दबाव निर्माण होत असतो. ज्यामुळे केवळ इंधनच (Fuel) जास्त लागत नाही तर, गाडीचा परफॉर्मेंसही कमी होत असतो. यासाठी भारत सरकारने रोड सेफ्टी आणि फ्यूअल एफिशिएंशीला डोळ्यासमोर ठेवून टायरसाठीही स्टार रेटिंग देण्याला सुरुवात केली आहे. 5 स्टार रेटिंग मिळविणारा मिशेलिन (Micheli) हा भारतातचा पहिला टायरचा ब्रँड बनला आहे. या माध्यमातून पहिल्यांदाच कुठल्या टायरला 5 स्टार रेटिंग देण्यात आलेली आहे. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंशीने मिशेलिन टायर्सला ही रेटिंग दिलेली आहे.

5 स्टार रेटिंग मिळवणारा पहिला ब्रँड

फ्रांसीसी टायर ब्रँड मिशेलिन 5 स्टार रेटिंग मिळविणारा भारतातील पहिला ब्रँड ठरला आहे. कंपनीने यासाठी ऑटोमॅटिक इंडस्ट्री स्टेंडर्डसव्दारे (AIS) ठरविण्यात आलेल्या नियमांनुसार आपल्या थर्ड जनरेशन लेटिट्यूड स्पोर्ट 3 आणि पायलेट स्पोर्ट 4 SUV टायरचे टेस्टींग केले होते. या दोन्ही टायरला 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. मिशेलिनच्या कमर्शियल टायरदेखील 4 स्टार रेटिंग मिळविणारे भारतातील पहिले टायर आहेत.

भारत सरकारचा नवीन नियम

भारत सरकारच्या नवीन नियमांनुसार, ऑक्टोबर 2022 पासून देशात विक्री होणार्या सर्व पॅसेंजर कारच्या टायर्सना ठरविण्यात आलेले सुरक्षा मानकांची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी ऑटोमॅटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्डसने नवीन नियम बनविले आहेत. यासाठी भारतातील टायर निर्मात्यांसह विदेशी टायर निर्मात्यांनाही बीईई स्टार लेबल घ्यावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

5 स्टार रेटिंगने इंधनाची बचत

AIS च्या दाव्यानुसार, 5 स्टार रेटिंग असलेल्या टायरचा वापर केल्यानं इंधनाचा खपामध्ये 9.5 टक्केपर्यंत कमतरता येण्याची शक्यता आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनमध्येही कमी येणार आहे. 5 स्टार रेटिंगच्या टायरचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जनमध्ये 750kg ची सरासरी कमी येणार आहे.

रोड सेफ्टीत होणार वाढ

5 स्टार रेटिंगचा वापर केल्यामुळे इंधनाचा खप कमी होईल, या शिवाय युजर्सची सेफ्टी देखील वाढणार आहे. आधीच इंधनाचे दर वाढले असल्याने यातून ग्राहकांना काही प्रमाणात तरी इंधनाचा भार हलका होणार आहे. या शिवाय गाडीची गुणवत्तादेखील टिकून राहिल.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.