AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car : कार घ्यायचीयं? थोड थांबा… उत्तम मायलेज व आकर्षक लूकसह ‘या’ तीन कार लवकरच होणार लाँच

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी या वर्षांच्या शेवटापर्यंत तीन मोठ्या कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. यात न्यू अल्टो हॅचबॅक आणि एसयुव्ही सेगमेंटच्या कार्सचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.

Car : कार घ्यायचीयं? थोड थांबा... उत्तम मायलेज व आकर्षक लूकसह ‘या’ तीन कार लवकरच होणार लाँच
कारImage Credit source: social
| Updated on: May 21, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई : मारुती सुझुकी भारतामध्ये या वर्षीच्या तीन मोठे लाँच करणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. भारतात सर्वात मोठा मार्केट शेअर मारुती सुझुकीचा आहे. कंपनीच्या सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल कार्सला चांगली मागणी आहे. आता नवीन माहितीनुसार, कंपनी या वर्षाच्या शेवटापर्यंत मारुती सुझुकी बलेनोला (Maruti Suzuki Baleno) सीएनजी व्हेरिएंटमध्ये (CNG variant) लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या व्हेरिएंटमध्ये काही बदलदेखील करण्यात आलेले आहेत. या लाँचमध्ये मारुती सुझुकीची बजेट हॅचबॅक कार मारुती अल्टोचाही (New Maruti Alto) समावेश असणार आहे. या सर्व कारला नवीन लूकमध्ये सादर करण्यात येणार आहे.

  1. न्यू मारुती अल्टो : भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीची सर्वाधिक बजेट कार मारुती अल्टो असून आता या कारमध्येही अनेक बदल करण्यात येणार आहे. नवीन मॉडेलमध्ये हार्टेक्ट प्लेटफॉर्म तयार करण्यात येत असून तो जुन्या व्हर्जनच्या तुलनेमध्ये मोठ्या आकारात मिळू शकतो. कंपनी आपल्या या कारमध्ये पेट्रोल इंजीन देउ शकते. सोबतच सीएनजी पॉवर ट्रेनदेखील यासह उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

  1. न्यू जनरेशन मारुती ब्रेझा : मारुती कार निर्माता कंपनीने भारतात आपले नेक्स्ट जनरेशन विटारा ब्रेझा नवीन व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. या मॉडेल्समध्ये शार्पर एक्सटीरियर स्टाईलिंग आणि नवीन इंटीरियर डिझाईन पहायला मिळणार आहे. सोबतच यात नवीन कटआउटचे अलॉय व्हील्सदेखील दिसून येणार आहे. यात न्यू K15C पेट्रोल इंजीन पहायला मिळणार आहे. सोबतच यात न्यू अर्टिगा आणि एक्सएल 6 ट्रांसमिशन बघायला मिळणार आहे. ही कार 5 स्पीड आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत उपलब्ध राहणार आहे.
  2. न्यू मिड साइज एसयुव्ही कार : मारुती सुझुकी एक न्यू सी सेगमेंटची एसयुव्ही कार तयार करीत आहे. ही कार भारतात लाँच होणार आहे. यासाठी कंपनीने टोयोटासोबत पार्टनरशिप केली आहे. दोन्हीही ब्रँड या कारला आपआपल्या नावाने सेल करणार आहे. या कारमध्ये कॉस्मेटिक रुपात काही बदल करण्यात आले आहे. ही कार दिवाळीच्या दरम्यान बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या कारमध्ये दोन पेट्रोल इंजीनचे पर्याय उपलब्ध होणार आहे. ज्यात एक माइल्ड हाइब्रिड सिस्टमसोबत लांच करण्यात येणार आहे. हायब्रिड तंत्रज्ञानाच्या मदतीने युजर्सना यातून चांगला मायलेज मिळणार आहे.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.