AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMW ने सादर केली ही जबरदस्त कार, काय आहेत वैशिष्ट्ये

BMW ची ही जबरदस्त कार तिच्या सेगमेंटमध्ये अत्याधुनिक आहे. या कारची वैशिष्ट्ये तिला इतर कारपेक्षा दर्जेदार ठरवितात.

BMW ने सादर केली ही जबरदस्त कार, काय आहेत वैशिष्ट्ये
BMW कार Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 13, 2022 | 10:55 PM
Share

मुंबई, लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने जागतिक स्तरावर आपली दुसरी पिढी (Second generation) M2 कारचे अनावरण केले आहे. ही एक कूप डिझाइन कार आहे. या कारचे बाह्य आणि आतील भाग अनेक आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया कारची खासियत काय आहे.

कशी दिसते  2023 BMW M2

M2 च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, याला दोन्ही बाजूला LED DRL सह स्लिम एलईडी हेडलॅम्प, एक मोठा एअर डॅम, क्वाड-एक्झॉस्ट टिप्ससह स्क्वॅश्ड रिअर बंपर,  किडनी ग्रिल, डिफ्यूझर, स्लिम एलईडी टेललाइट्स, 19-इंचाचा बंपर मिळतो. 20-इंचाची मागील चाके देण्यात आली आहेत.

2023 BMW M2 इंजिन

कंपनीने आता नवीन BMW M2 मध्ये S58 पॉवर युनिट वापरले आहे. कंपनीच्या सध्याच्या M3 आणि M4 कारमध्येही हेच इंजिन देण्यात आले आहे. नवीन M2 मध्ये 3.0L ट्विन-टर्बो चार्ज केलेले इनलाइन, 6-सिलेंडर इंजिन आहे.

हे इंजिन 453 bhp पॉवर आणि 550 न्यूटन मीटर कमाल टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह कार केवळ 3.9 सेकंदात 0-60 mph पर्यंत वेग घेऊ शकते आणि M ड्रायव्हर पॅकसह कमाल 284 किमी/ताशी वेग वाढवू शकते.

2023 BMW M2 वैशिष्ट्ये

सेकंड जनरेशन M2 ला 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 5 रंग पर्याय अल्पाइन व्हाईट, M-विशिष्ट नियंत्रणे आणि कॉन्फिगरेशन, ब्रुकलिन ग्रे मेटॅलिक, टोरंटो रेड मेटॅलिक, iDrive 8 सॉफ्टवेअर, 14.9-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, सॅफायर मेटॅलिक, एक नवीन एम झेड आणि एक नवीन एम. कार्बन बकेट स्पोर्ट सीट्स सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.