दुचाकीप्रेमींसाठी खुशखबर! 28000 रुपयांनी स्वस्त झाली ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; आजपासून बुकिंग सुरु

| Updated on: Jul 15, 2021 | 8:05 AM

दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद या सहा शहरांमध्ये ही बुकिंग सुरु होईल, असे कंपनीने जाहीर केले आहे. बुकिंग आज दुपारी 12 वाजता सुरु केली जाणार आहे.

दुचाकीप्रेमींसाठी खुशखबर! 28000 रुपयांनी स्वस्त झाली ही इलेक्ट्रिक बाईक; आजपासून बुकिंग सुरु
दुचाकीप्रेमींसाठी खुशखबर! 28000 रुपयांनी स्वस्त झाली 'ही' इलेक्ट्रिक बाइक
Follow us on

नवी दिल्ली : रिव्होल्ट मोटर्सने (Revolt Motors) आपली प्रमुख इलेक्ट्रिक बाईक ‘RV400’ची बुकिंग पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. Revolt कंपनीने दिल्लीमध्ये RV400 बाईकसाठी 28,000 रुपयांची मोठी दरकपात केली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद या सहा शहरांमध्ये ही बुकिंग सुरु होईल, असे कंपनीने जाहीर केले आहे. बुकिंग आज दुपारी 12 वाजता सुरु केली जाणार आहे. मागील वेळी जेव्हा कंपनीने ‘आरव्ही 400’ची बुकिंग खुली केली होती, त्यावेळी बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आताच्या बुकिंगलाही तसाच भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा कंपनीने बाळगली आहे. (This electric bike became cheaper by Rs 28,000; Booking starts from today)

कंपनीचे म्हणणे आहे की, आम्ही 50 कोटी रुपये किंमतीची ‘RV400’ इलेक्ट्रिक बाइक विकली. ही बाईक लाईव्ह केल्यानंतर पुढील दोन तासांतच बुकिंग बंद करावी लागली. Revolt Motors ने म्हटले आहे कि, बुक करण्यात आलेली ‘RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकल’ची डिलिव्हरी सप्टेंबर 2021 पासून सुरु केली जाणार आहे. जर तुम्ही ‘RV400 इलेक्ट्रिक बाइक’ बुक करण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला केवळ कंपनीच्या ‘www.revoltmotors.com या अधिकृत वेबसाइटवर “Notify Me” या टॅबवर क्लिक करावे लागेल आणि तुमची माहिती द्यावी लागेल, असे Revolt Motors ने स्पष्ट केले आहे.

गाडीची दमदार फीचर्स

Revolt RV400 मध्ये एक 3 केडब्ल्यू (मिड ड्राइव्ह) मोटर मिळते. ज्यात 72 व्ही, 3.24 केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरीसोबत जोडण्यात येते. ही दुचाकी ताशी 85 किमीच्या ‘टॉप स्पीड’च्या पातळीला स्पर्श करते. तसेच ही बाइक MyRevolt अँपसोबतसुद्धा मिळते. अँपमध्ये तुम्हाला कंप्लीट बाइट डायगनॉस्टिक, बॅटरी स्टेट्स, राइड स्टॅटिस्टिक्स आणि सर्वात जवळच्या रिवॉल्ट स्विच स्टेशनची माहिती देण्यात आलेली असते. यामाध्यमातून तुम्ही बॅटरी स्वॅप करू शकाल.

Revolt RV400 मध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन रायडिंग मोडसुद्धा मिळतात. सस्पेंशन सिस्टममध्ये अपसाइड-डाउन (यूएसडी) फोर्क्स अप-फ्रंटबरोबर रियरमध्ये पूर्णपणे अडजस्टेबल मोनोशॉकचा समावेश आहे. देशातील वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा सरकारने गांभीर्याने विचारात घेतला आहे. त्याच अनुषंगाने सरकार सध्या इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. त्याच दिशेने वाटचाल करताना सरकारने FAME II या योजनेमध्ये सुधारणा केली आहे. त्याचदरम्यान Revolt कंपनीने दिल्लीमध्ये RV400 बाइकसाठी 28,000 रुपयांची मोठी दरकपात केली आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर RV400 बाइक 90,799 रुपये (एक्स-शोरूम) या आकर्षक किमतीवर उपलब्ध झाली आहे. या दरकपातीमुळे ग्राहक अधिक चांगला प्रतिसाद देण्याची चिन्हे आहेत. (This electric bike became cheaper by Rs 28,000; Booking starts from today)

इतर बातम्या

10 ऑगस्टला देशभरात बत्ती गुल होण्याची शक्यता; सरकारचा एक निर्णय ठरू शकतो कारणीभूत

अ‍ॅक्सिस बँकेच्या FD आणि RD मध्ये गुंतवणूक करायचीय, पेनल्टीशिवाय करा हे काम