
सणासुदीच्या तोंडावर मारुती सुझुकी एर्टीगा ( Maruti Suzuki Ertiga ) आता नव्या फिचर्स आणि डिझाईन अपडेट्स सह लाँच केली गेली आहे. यात ब्लॅक एक्सेंटवाला नवीन रुफ स्पॉयलर दिलेला आहे, जो आता सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड मिळेल. आता या नव्या लुकमुळे Ertiga चा लूक आता जास्त स्पोर्टी आणि प्रीमियम झाला आहे. चला तर जीएसटी 2.0 रिफॉर्म्स नंतर Maruti Suzuki Ertiga ची सुरुवातीची एक्स -शोरुम किंमत किती ? ते पाहूयात….
Ertiga चा आता एसी सिस्टीम अपग्रेड केला आहे. आधी सेकंड – रॉचे वेंट्स रुफवर होते ते आता सेंटर कंसोलच्या मागे शिफ्ट केले आहेत. तिसऱ्या रॉमध्येही इंडिपेंडेंट एसी वेंट्स आणि एडजस्टेबल ब्लोअर कंट्रोल दिले आहेत. या बदलामुळे सर्व प्रवाशांना पहिल्यापेक्षा अधिक जास्त कुलिंगचा अनुभव मिळणार आहे.
वास्तविक, नवीन अपडेटमध्ये सेकंड आणि थर्ड-रो पॅसेजर्ससाठी USB-C चार्जिंग पोर्ट्स देखील दिले आहेत.ज्यामुळे मॉडर्न चार्जिंग गरजा सहज पूर्ण होणार आहेत. इंजिनात कोणताही बदल केलेला नाही. यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहेत. जे 102bhp पॉवर आणि 136.8Nm टॉर्क देते. ट्रान्समिशन पर्यायामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक सामील आहेत. सीएनजी व्हर्जन केवळ मॅन्युअल गिअर बॉक्स सह येतो.
ऑगस्ट 2025 मध्ये Maruti Suzuki Ertiga ने SUV ट्रेंडला मागे टाकत भारताची सर्वाधिक विक्री असलेली पॅसेंजर व्हेईकल होण्याचा मान मिळवला होता. या वेळी या कारच्या 18,445 युनिट्सची विक्री झाली होती.
या कारने Maruti Dzire ( 16,509 यूनिट्स ) आणि Hyundai Creta ( 15,924 यूनिट्स ) सारख्या प्रसिद्ध कारना मागे टाकले होते. टॉप-10 लिस्टमध्ये वॅगनआर, टाटा नेक्सॉन, ब्रेझा, बलेनो, फ्रॉन्क्स, स्विफ्ट आणि ईको देखील सामील आहेत.
जीएसटी 2.0 रिफॉर्म्सनंतर Maruti Suzuki Ertigaची सुरुवातीची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत आता 8.80 लाख रुपये झाली आहे. व्हेरिएंटच्या हिशोबाने सुमारे 50,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. ज्यामुळे कुटुंबासाठी ही कार आणखी स्वस्त झाली आहे.
Ertiga चा मुकाबला भारतीय बाजारात काही प्रसिद्ध एमपीव्हीशी आहे.त्यात Toyota Rumion सामील आहे, जो वास्तविक Ertiga चे रिबॅज्ड व्हर्जन आहे. याशिवाय प्रीमीयम आणि कफर्टसाठी ओळखली जाणारी Kia Carens देखील एक मोठा स्पर्धक आहे. या कारला तर Mahindra Marazzo ग्राहकांना जादा स्पेस आणि दमदार इंजिनमुळे तगडी स्पर्धा देते. महत्वाचे म्हणजे या कारमध्ये सीएनजी व्हर्जन देखील आहे.तरीही Ertiga तिच्या स्वस्तातील सीएनजी मॉडेलमुळे फॅमिली कार खरेदी करणाऱ्यांची ही पहिली पसंद आहे.