पेट्रोल कार्सपेक्षा दमदार, ‘या’ आहेत देशातील टॉप 5 CNG गाड्या

आज आम्ही तुमच्यासाठी TOP 5 CNG गाड्यांची लिस्ट आणली आहे. ही वाहनं त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट आणि पेट्रोल कार्सपेक्षा उत्तम आहेत.

पेट्रोल कार्सपेक्षा दमदार, 'या' आहेत देशातील टॉप 5 CNG गाड्या
Maruti Wagon R Lxi Cng

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळेच भारतात सीएनजी गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी टॉप 5 सीएनजी गाड्यांची लिस्ट आणली आहे. ही वाहनं त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट आहेत. तसेच पेट्रोल कार्सपेक्षा उत्तम आहेत. (Top CNG Cars in India, Maruti Suzuki Alto, WagonR,S- Presso, Celerio Hyundai Santro)

या यादीत पहिला क्रमांक मारुती सुझुकी ऑल्टो (Maruti Suzuki Alto) या कारचा आहे. ऑल्टो कारमध्ये 800cc इंजिन आहे जे 40PS / 60Nm टॉर्क देते. या कारचं पेट्रोल व्हेरिएंट 1 लीटरमध्ये 22.05 लीटर मायलेज देते, तर 1 किलो सीएनजीमध्ये हे वाहन 31.59 किमीचं मायलेज देते. LXI आणि LXI (O) व्हेरिएंट सीएनजी प्रकारात उपलब्ध आहे.

Maruti Suzuki S- Presso

मारुती सुझुकी S- Presso ही कार या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारमध्ये 1.0 लीटरचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. सीएनजीवर हे वाहन 57 पीएस आणि 78 एनएम टॉर्क देते. सीएनजी व्हेरिएंट पेट्रोल व्हेरिएंटपेक्षा 10 किमी अधिक मायलेज देते. म्हणजेच प्रत्येक किलोग्राम सीएनजीमध्ये 31.2 किमीचं मायलेज मिळतं. S Presso सीएनजी कार LXI, LXI(O), VXI आणि VXI(O) व्हेरिएंटमध्ये येते.

Maruti Suzuki WagonR

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) ही कार या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही कार 1.0 लीटर थ्री सिलिंडर इंजिनसह येते. यात आपल्याला 57PS आणि 78Nm टॉर्क मिळेल. या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास ही देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी सीएनजी कार आहे. ही कार एक किलो सीएनजीवर 32.52 किमीचे मायलेज देते.

Maruti Suzuki Celerio

या यादीत चौथा क्रमांक मारुती सुझुकी सेलेरिओ या कारचा लागतो. सेलेरिओमध्ये आपल्याला 1.0 लीटर पेट्रोल इंजिन मिळते. या कारचे सीएनजी इंजिन 57PS आणि 78Nm टॉर्क देते. तर पेट्रोल व्हेरिएंट 21 किमीचं मायलेज देतं, तर सीएनजीवर ही कार 30.47 किमी प्रति किलो इतकं मायलेज देते. या कारची किंमत 5.85 लाख रुपयांपासून सुरु होते.

Hyundai Santro

या यादीतील शेवटची आणि पाचवी कार ह्युंदाय सँट्रो ही आहे. यात आपल्याला 1.1-लिटरचे चार सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल तर सीएनजी व्हेरिएंटमध्ये 60 पीएस आणि 85 एनएम टॉर्क मिळेल. मायलेजच्या बाबतीत, या कारचे पेट्रोल व्हेरिएंट 20.3 किमीचे मायलेज देते तर सीएनजी येथे 30.48 किमीचे (प्रति किलो) मायलेज देते. सीएनजीमध्ये आपल्याला मॅग्ना आणि स्पोर्ट्स प्रकार आढळतात. या कारची किंमत 5.92 लाख ते 6.06 लाखांपर्यंत आहे.

संबंधित बातम्या

पेट्रोल-डिझेलचा जमाना गेला, देशात CNG गाड्यांना वाढती मागणी, ‘या’ कंपनीकडून 1,57,954 कार्सची विक्री

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर Tata Motors चा जालीम उपाय, ग्राहकांना दिलासा देणारी घोषणा