Toyota Fortuner आणि Legender चा मार्केटमध्ये जलवा, एका महिन्यात ग्राहकांकडून हजारो गाड्यांचे बुकिंग

| Updated on: Feb 06, 2021 | 5:03 PM

टोयोटा मोटर्सने (Toyota Motors) गेल्या महिन्यात भारतात फॉर्च्युनरचं (Toyota Fortuner) फेसलिफ्ट वर्जन लाँच केलं होतं.

Toyota Fortuner आणि Legender चा मार्केटमध्ये जलवा, एका महिन्यात ग्राहकांकडून हजारो गाड्यांचे बुकिंग
Follow us on

मुंबई : टोयोटा मोटर्सने (Toyota Motors) गेल्या महिन्यात भारतात फॉर्च्युनरचं (Toyota Fortuner) फेसलिफ्ट वर्जन लाँच केलं होतं. नवीन मॉडलमध्ये स्टायलिंग, पॉवर डिझेल इंजिन आणि नवीन वेरिएंट Legender सादर केलं होतं. दरम्यान कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, त्यांनी या कारसाठीच्या 5000 बुकिंग्सचा टप्पा पार केला आहे. टोयोटा फॉर्च्युनर ही कार तिच्या सेगमेंटमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. फॉर्च्युनरच्या विक्रीच्या जोरावर कंपनीने 53 टक्के मार्केट शेयरवर कब्जा केला आहे. येत्या काळात ही आकडेवारी अजून वाढणार आहे. (Toyota Fortuner Facelift And Legender Cross 5000 Bookings In India)

कंपनीने आतापर्यंत फॉर्च्युनरच्या एकूण 1.7 लाख युनिट्सची विक्री केली आहे. तर नवीन Legender लुक्स आणि डिझाईनच्या बाबतीत Fortuner च्या रेग्युलर मॉडलपेक्षा अधिक स्पोर्टी आहे. यामध्ये डुअल टोन कलर पॅटर्न, शार्प हेडलँप डे टाईम रनिंग लाईट्ससह नवीन बंपर आणि काही कॉस्मेटिक अपडेट्स दिले आहेत. यामध्ये 20 इंचांचं डु़अल टोन अलॉय व्हीलही देण्यात आलं आहे, ज्यामुळे या कारची साईड प्रोफाईल अधिक बोल्ड दिसते.

अशी आहे नवीन Toyota Fortuner

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ही अपडेटेड एसयूव्ही थायलंडमध्ये सादर करण्यात आली होती. नवीन फॉर्च्युनर सध्याच्या (रेग्युलर) 2.8L डिझेल इंजिनचं पॉवरफुल व्हर्जन आहे. अपडेटेड फॉर्च्यूनर 201 bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते. याच्या ट्रान्समिशनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अपडेटेड मॉडल 6 स्पीड मॅन्यूअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससोबत आहे. या एसयूव्हीच्या फ्रंट एंडमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या डिझाईनमध्ये मॅश पॅटर्न ग्रिल, LED DRL सह रिवाइज्ड हेडलँप्स, अपडेटेड फॉग लँप इनक्लोजर, नवे बंपर, सिल्व्हर स्किड प्लेटही आहे. तसेच यामध्ये नव्या डिझाईनसह एलॉय देण्यात आले आहेत.

टोयोटा फॉर्च्यूनर 2021 फेसलिफ्टच्या केबिन मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये 8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे, जी अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्लेला सपोर्ट करते. तसेच यामध्ये वायरलेस मोबाइल फोन चार्जिंग, एम्बिएंट लायटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर्ड फ्रंट सीट्ससारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. फेसलिफ्ट फॉर्च्यूनरची किंमत रेग्युलर मॉडेलपेक्षा जास्त आहे.

मॉडेलची किंमत

1) Toyota Fortuner फेसलिफ्ट- पेट्रोल

      >> 4X2 मॅन्यूअल : 29.98 लाख रुपये
     >> 4X2 ऑटो : 31.57 लाख रुपये

2) Toyota Fortuner फेसलिफ्ट- Diesel

>> 4X2 मॅन्यूअल : 33.48 लाख रुपये
>> 4X2 ऑटो : 34.84 लाख रुपये
>> 4X4 मॅन्यूअल : 35.14 लाख रुपये
>> 4×4 ऑटो : 37.43 लाख रुपये

Fortuner Legender 4X2 ऑटो: Rs 37.58 लाख रुपये

फॉर्च्यूनरच्या नव्या मॉडलमधील स्टँडर्ड व्हर्जनमध्ये Sleek Headlamps, नवे ग्रिल, नवे बंपर स्प्लिटर दिलेले आहे. या सर्व बदलांमुळे जुन्या Fortuner च्या तुलनेत नवी Fortuner अतिशय स्टाईलीश आणि अ‌ॅग्रेसीव्ह अशी आहे. Toyota कंपनीने Fortuner या गाडीचे इंजिन अपग्रेड केले आहे. नव्या इंजिमध्ये जास्त कार्यक्षमता असून नवी Fortuner पेट्रोल आणि डिझेल अशी दोन्ही प्रकारच्या इंधनांवर चालू शकते. 2.7 लीटर Petrol Engine 164 Bhp च्या क्षमतेने 245 Nm च्या Peak टॉर्कची निर्मीती करेल.

हेही वाचा

Vehicle Scrappage Policy | जुनी वाहनं स्क्रॅप करण्यासाठी सरकार प्रोत्साहन निधी देणार

बंपर ऑफर! Maruti Suzuki च्या ‘या’ 6 गाड्यांवर 49,000 रुपयांपर्यंतची सूट

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नाही द्यावी लागणार टेस्ट, वाचा काय आहे सरकारचा नवा नियम

(Toyota Fortuner Facelift And Legender Cross 5000 Bookings In India)