AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोयोटा फॉर्च्युनर नवीन अवतारात लाँच, मिळणार खास फीचर्स, किंमत किती?

फॉर्च्युनर लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. टोयोटा फॉर्च्युनर निओ ड्राइव्ह ४८व्ही या कारला हायब्रिड तंत्रज्ञानासह लाँच करण्यात आले आहे. यातीस फीचर्स आणि त्याची किंमत जाणून घेऊयात.

टोयोटा फॉर्च्युनर नवीन अवतारात लाँच, मिळणार खास फीचर्स, किंमत किती?
New Fortuner
| Updated on: Jun 05, 2025 | 11:27 PM
Share

टोयोटा फॉर्च्युनर हा भारतातील लोकप्रिय कारपैकी एक आहे. या कारची क्रेझ लहाणांपासून थोरांपर्यंत आहे. अशातच आता फॉर्च्युनर लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. टोयोटा फॉर्च्युनर निओ ड्राइव्ह ४८व्ही या कारला हायब्रिड तंत्रज्ञानासह लाँच करण्यात आले आहे. ही एसयूव्ही फॉर्च्युनर निओ ड्राइव्ह ४८व्ही आणि लेजेंडर निओ ड्राइव्ह ४८व्ही अशा दोन व्हे्रियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. मात्र या कारच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही मात्र कारमध्ये यांत्रिक बदल करण्यात आले आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टोयोटा फॉर्च्युनर निओ ड्राइव्ह ४८व्हीमध्ये जुनेच २.८-लिटर ४-सिलेंडर टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे, मात्र हे इंजिन आता बेल्ट-इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर आणि लिथियम-आयन बॅटरीसह ४८-व्होल्ट सिस्टमशी जोडण्यात आले आहे. यामुळे ड्रायव्हिंग स्मूथ होईल आणि कार चांगले मायलेज देईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

बॅटरी कशी चार्ज होणार?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हायब्रिड फॉर्च्युनरमधील बॅटरी डिलेरेशन ब्रेकिंग सिस्टमद्वारे चार्ज होणार आगे. या तंत्रज्ञानात जेव्हा ब्रेक दाबला जातो तेव्हा बॅटरीची चार्जिंग सुरू होते. तसेच कारमधील स्टार्ट-स्टॉप फंक्शन इंधन वाचवते त्याचबरोबर कार थांबलेली असताना इंजिन बंद करून प्रदूषण कमी करते. यात मल्टी-टेरेन सिलेक्ट सिस्टमही देण्यात आलेली आहे, जी थ्रॉटल रिस्पॉन्स, ब्रेकिंग आणि ट्रॅक्शन कंट्रोल करण्यास मदत करते.

किंमत किती असेल?

टोयोटा फॉर्च्युनर निओ ड्राइव्ह ४८व्ही सध्या निओ ड्राइव्ह ४८व्ही आणि लेजेंडर निओ ड्राइव्ह ४८व्ही दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत अनुक्रमे ४४.७२ लाख रुपये आणि ५०.०९ लाख रुपये आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. नवीन ४८व्ही व्हेरिएंट फॉर्च्युनर लाइनअपमधील दुसरा सर्वात महागडा व्हेरिएंट आहे.

फॉर्च्युनरची डिझाइन

नवीन टोयोटा फॉर्च्युनर निओ ड्राइव्ह ४८व्हीच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पांढरा आणि काळा ड्युअल-टोन कलर स्कीम, शार्प हेडलॅम्प डीआरएल आणि कागीकॉस्मेटिक बदल करण्यात आलेले आहेत. त्यात २०-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स देखील देण्यात आलेले आहेत.

कोणते फीचर्स मिळणार ?

या कारच्या आतमध्ये मिळणाऱ्या फीचर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज ड्युअल-टोन इंटीरियर, लेदर अपहोल्स्ट्री, अँबियंट लाइटिंग, इन्फोटेनमेंटसाठी डिजिटल स्क्रीन आणि वायरलेस चार्जिंग असे फीचर्स मिळत आहेत. तसेच व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सबवूफर आणि अॅम्प्लीफायरसह ११ प्रीमियम JBL स्पीकर्ही या कारमध्ये मिळत आहेत.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.