AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Triumph Tiger 100 : टायगर अभी जिंदा है; 68 वर्षांपूर्वीच्या या बाईकचे इंजिन Bullet हून पण दमदार, सलमान खानच्या ‘अब्बू’ ची पहिली पसंत पाहीली का?

Triumph Tiger 100 Salim Khan : दबंग ॲक्टर सलमान खान याने त्याच्या अब्बूची पहिली पसंत जगासमोर आणली आहे. त्याने वडिलांचे, लेखक सलीम खान यांचे या बाईकसोबतचं फोटोशूट केलं आहे. हे छायाचित्र त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या बाईकची सध्या समाज माध्यमांवर चर्चा सुरू झाली आहे.

Triumph Tiger 100 : टायगर अभी जिंदा है; 68 वर्षांपूर्वीच्या या बाईकचे इंजिन Bullet हून पण दमदार, सलमान खानच्या 'अब्बू' ची पहिली पसंत पाहीली का?
टायगर अभी जिंदा है
| Updated on: Nov 22, 2024 | 5:03 PM
Share

बॉलिवूडमधील दबंग ॲक्टर सलमान खान गेल्या काही दिवसांपासून बिश्नोई गँगमुळे चिंतेत आहे. तरीही त्याने वडिलांसाठी काही ‘फुरसत के पल’ शोधलेच. त्याने वडिलांचे, लेखक सलीम खान यांचे या बाईकसोबतचं फोटोशूट केलं आहे. हे छायाचित्र त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या छायाचित्रात सलीम खान एका बाईकवर दिसत आहेत. सलमान खान याने ही वडिलांची पहिली बाईक असल्याचा खुलासा केला आहे. या बाईकचे नाव Triumph Tiger 100,1956,असे आहे. काय आहे या बाईकचे वैशिष्ट्ये, या बाईकचे इंजिन आताच्या Royal Enfield Bullet 350 पेक्षा कसे दमदार आहे?

Triumph Tiger 100 चे वैशिष्ट्ये काय?

68 वर्ष जुनी ही बाईक त्याकाळी भारतीय बाजारात रॉयल एनफील्डच्या बुलेटची स्पर्धक होती. या बाईकचे इंजिन बुलेटपेक्षा अधिक दमदार आहे. 1940 मध्ये दुसर्‍या जागतिक युद्धा दरम्यान जर्मनीच्या बॉम्ब हल्ल्यात ट्रायम्फ कंपनीचा कारखाना नष्ट झाला. त्यानंतर या बाईकचे उत्पादन थांबवण्यात आले.

पण 1946 मध्ये या बाईकचे उत्पादन पुन्हा एकदा सुरू झाले. या मोटारसायकलमध्ये कंपनीने तेव्हा 498 सीसीचे इंजिन दिले होते. हे इंजिन 32.7PS ची पॉवर जनरेट करत होते. या बाईकचे वजन थोडेथोडके नाही तर 175 किलो इतके होते. या बाईकमध्ये 18.2 लिटरची इंधन टाकी होती. या मोटारसायकलमध्ये 19 इंचीचे चाक दिले होते.

वर्ष 1939 मध्ये ट्रायंफने या बाईकला जगासमोर सादर केले. ही बाईक किती दमदार आहे, हे तपासण्यासाठी ही बाईक रेस ट्रॅकवर दामटण्यात येत असे. त्यावेळी ही बाईक 2900 किलोमीटर पर्यंत पळवण्यात येत असे. सलमान खान याने बाईकसोबत वडिलांचे फोटोशूट केले आहे. यावेळी तो हळवा झालेला दिसला. ही आपल्या वडिलाची पहिली बाईक असल्याचा उल्लेख त्याने केला आहे.

Royal Enfield Bullet 350 Price

रॉयल एनफील्डची सर्वात लोकप्रिय बाईक, बुलेट 350 मध्ये कंपनीने 349 सीसीचे इंजिन दिले आहे. हे इंजिन 20.2bhp ची शक्ती, ऊर्जा तयार करते. या बाईकची किंमत 1 लाख 73 हजार 562 रुपये (एक्स शोरूम) अशी आहे.

Follow Us
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर