यामाहा, हिरोला TVS देणार आव्हान! नव्या स्कूटरची मार्केटमध्ये फूल हवा

टीव्हीएस कंपनीने वाढत्या स्कूटरची मागणी पाहता बाजारात नवी स्कूटर आणण्याची तयारी केली आहे. टी शेप्ड लूकची भूरळ स्कूटर चाहत्यांना पडली आहे. इतकंच काय तर स्पोर्टी लूकमुळे ही स्कूटर अधिक आकर्षक वाटत आहे. त्यामुळे बाजारात या स्कूटरची चर्चा रंगली आहे.

यामाहा, हिरोला TVS देणार आव्हान! नव्या स्कूटरची मार्केटमध्ये फूल हवा
यामाहा, हिरोला TVS देणार आव्हान! नव्या स्कूटरची मार्केटमध्ये फूल हवा
| Updated on: Aug 14, 2025 | 5:39 PM

टीव्हीएस कंपनीने भारतीय स्कूटर चाहत्यांचं आधीच मन जिंकलं आहे .एनटॉर्कसह भारतीय बाजारात स्पोर्टी स्कूटरची धूम आहे. या गाडीची मागणी बाजारात असताना आता कंपनी स्पोर्टी स्कूटरसह उतरण्याची तयारी करत आहे. कंपनीने या स्कूटरबाबत फार काही खुलासा केलेला नाही. पण या गाडीचं डिझाईन लाँच होण्यापूर्वी लोकप्रिय झालं आहे. एनटॉर्कची अपडेट वर्जन असेल हे डिझाईनवरूनच स्पष्ट होते. एनटॉर्क 150 म्हणून बाजारात लाँच केली जाऊ शकते. अपडेटेड टीव्हीएस एनटॉर्क 150 ची लोकप्रियतेसोबत मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही स्कूटर गणपती उत्सवात म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीत या गाडीला चांगलं मार्केट मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक कंपनी या सणांपूर्वी नवीन प्रोडक्ट बाजारात आणण्याच्या तयारीत असतो. हेच लक्ष्य ठेवून टीव्हीएस एनटॉर्क 150 स्कूटर लाँच केली जाणार आहे. ही स्कूटर थेट यामाहा एरोक्स 155, अप्रिला एसआर 175 आणि हिरो झूम 160 शी स्पर्धा करेल.

टीझर क्लिपमध्ये गाडीची डिझाईन स्पष्ट दिसते. यात टीव्हीएसने क्वाड प्रोजेक्टर एलईडी हेडलाईट सेटअपसह लूक सर्वांसमोर सादर केला आहे. या डिझाईनची चर्चा रंगली आहे. या गाडीचा परिचित टी शेप्ड आहे. तसेच एक खोल बेस एक्झॉस्ट नोट आहे. त्यामुळे या गाडीचा लूक पाहता ही एनटॉर्क 150 असू शकते, असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. आता गाडी लाँच झाल्यावर त्याच्या लूकची चर्चा आणखी रंगणार यात काही शंका नाही.

या स्कूटरला 150 सीसी इंजिन असेल. त्या माध्यमातून 12 बीएचपी कमाल पॉवर आणि 13 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करेल. गाडीला दोन्ही चांकांना 14 इंचाचे अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे. टीव्हीएस स्कूटरमधील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. यामुळे खड्ड्यंचं साम्राज्य असलेल्या रोडवर स्कूटर चालवताना जास्त हाचके बसणार नाहीत. तसेच गाडी चालवताना काही प्रमाणात स्मूथनेस मिळेल. पुढच्या चाकाला ब्रेकसाठी डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तसेच रेडर 125 मधील 5.0 टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल.