AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 6 सेकंदात 100 KMPL स्पीड, 125cc सेगमेंटमध्ये TVS Raider ची एंट्री

टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) गुरुवारी आपली नवीन मोटारसायकल टीव्हीएस रायडर लाँच केली. कंपनीची ही बाईक 125 सीसी सेगमेंटमध्ये नवीन एंट्री आहे.

अवघ्या 6 सेकंदात 100 KMPL स्पीड, 125cc सेगमेंटमध्ये TVS Raider ची एंट्री
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 4:41 PM
Share

मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) गुरुवारी आपली नवीन मोटारसायकल टीव्हीएस रायडर लाँच केली. कंपनीची ही बाईक 125 सीसी सेगमेंटमध्ये नवीन एंट्री आहे, जे देशातील मोटारसायकलप्रेमींचे सर्वात आवडते सेगमेंट आहे. त्यामुळे या बाईकची स्पर्धादेखील कठीण होणार आहे. (TVS Raider 125 launched at Rs 77,500 price)

सर्वप्रथम TVS Raider च्या लूकबद्दल बोलूया, तरुण पिढीची निवड लक्षात घेऊन कंपनीने या बाईकला Naked Street Design दिले आहे. अॅनिमल आय स्टाईल हेडलॅम्प त्याला बोल्ड लुक देतात. स्कल्पटेड टँक प्रोफाइल या बाईकला खूप स्पोर्टी बनवते.

कंपनीने TVS Raider मध्ये Smartxonnecttm ची सुविधा दिली आहे. जे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि त्यात व्हॉईस असिस्टंटची सुविधा देते. तत्पूर्वी तंत्रज्ञान कंपनीने हे फीचर आपल्या Ntorq स्कूटरमध्ये यापूर्वी दिले आहे. याशिवाय, कंपनीने यात आपले IntelliGo तंत्रज्ञान देखील दिले आहे जे या मोटरसायकलचे मायलेज सुधारते.

कंपनीने TVS Raider मध्ये पूर्ण डिजिटल स्पीडोमीटर दिले आहे. मोटारसायकलच्या या विभागातील हे पहिले फीचर आहे. यासाठी बाईकमध्ये रिव्हर्स एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. 5 इंचाची ही स्क्रीन नेव्हिगेशन सुविधा पुरवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

दमदार इंजिन

TVS Raider 124.8cc एअर कूल्ड किंवा ऑइल कूल्ड 3V इंजिनसह सुसज्ज आहे. हे जास्तीत जास्त 11.2bhp ची पॉवर आणि 11.2Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्याचबरोबर ही मोटरसायकल 5.9 सेकंदात 100 किमी पर्यंत वेग धारण करु शकते.

कलर ऑप्शन्स

TVS Raider मध्ये सीटच्या खाली स्टोरेज, हेल्मेट रिमाइंडर, यूएसबी चार्जरसारखे फीचर्स दिले आहेत. मोटारसायकल Striking Red, Blazing Blue, Wicked Black आणि Fiery Yellow कलर्समध्ये उपलब्ध असेल.

किंमत

TVS Raider च्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटची एक्स-शोरूम प्राइस 77,500 रुपये इतकी आहे. तर डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 85,469 रुपयांपासून सुरु होते. 125cc मोटरसायकल सेगमेंटमध्ये या बाईकला Honda CB Shine, Bajaj Pulsar 125, Bajaj Discover 125, KTM 125 Duke आणि Hero Super Splendor सारख्या गाड्यांशी स्पर्धा करावी लागेल.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 300 किमी रेंज, ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे नीती आयोगाकडून कौतूक, केंद्राने अधिक प्रोत्साहन द्यावे; आदित्य ठाकरेंची मागणी

अवघ्या 1.9 लाखात घरी न्या Maruti Swift, झिरो डाऊनपेमेंटसह ‘इतक्या’ महिन्यांची वॉरंटी

(TVS Raider 125 launched at Rs 77,500 price)

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....