पेट्रोलच्या दरवाढीने त्रस्त आहात? आता येत आहेत ‘या’ दमदार CNG कार, स्टायलिश लूक सोबत पैशांचीही बचत

| Updated on: Oct 08, 2021 | 3:24 PM

भारतात पेट्रोलच्या दरवाढीमध्ये दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. सतत वाढण्याऱ्या पेट्रोलच्या किंमतीमुळे जर तुम्ही चिंतेत असाल तर लवकरच तुमच्यासाठी भारतीय बाजारात दमदार फिचर्स आणि जबरदस्त लूक असणाऱ्या सीएनजी गाड्या येणार आहेत.

पेट्रोलच्या दरवाढीने त्रस्त आहात? आता येत आहेत या दमदार CNG कार, स्टायलिश लूक सोबत पैशांचीही बचत
Follow us on

मुंबई : (Upcoming cars in india 2021) भारतात पेट्रोलच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. सतत वाढण्याऱ्या पेट्रोलच्या किंमतीमुळे जर तुम्ही चिंतेत असाल तर लवकरच तुमच्यासाठी भारतीय बाजारात दमदार फिचर्स आणि जबरदस्त लूक असणाऱ्या सीएनजी गाड्या येणार आहेत. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या कमी प्रदूषण करतात. या सोबतच इलेक्ट्रिक-कार हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

मारुती सुझुकी डिझायर, मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी (Maruti Swift and Dzire’s CNG )

मारुती सुझुकी कंपनी सध्या आपल्या आगामी सुझुकी डिझायर आणि स्विफ्टच्या सीएनजी व्हेरिएंटवर काम करीत आहे. या दोन्ही गाड्यामध्ये सीएनजीवर चालताना पॉवर आउटपुट कमी होऊन 70 बीएचपी आणि टॉर्क आउटपुट 95 एनएमपर्यंत जाते. (These are the special features of Maruti Swift and Dzire’s CNG models) या दोन्ही गाड्यांच्या प्रकरणात कंपनीने 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळाले आहेत. ही गाडी ऑटो स्टार्ट/स्टॉप फिचरसह येते. या दोन्ही गाड्यां फिचर्समुळे इंधन वाचवण्यास मोठी मदत होईल.

टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago CNG)

देशातील प्रमुख कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors)आता सीएनजी सेगमेंटमध्येही अग्रेसर होण्याचे ठरवले आहे. टाटाच्या हॅचबॅक टियागो (Tiago) आणि कॉम्पॅक्ट सेडान टिगॉरच्या (Tigor)सीएनजी वाहनांची बाजारात दमदार एन्टी होणार आहे. कंपनीने लिमिटेड एडिशन टियॅगोमध्ये 14 इंचांचे एलॉय व्हील्स दिले आहेत. रेग्युलर ट्रिमशिवाय Tiago लिमिटेड एडिशनमध्ये रियर पार्सल ट्रे आणि वॉईस कमांड सिस्टिमसह पाच इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. गाडीत 1.2 लीटरचं रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. याची मोटर 5 स्पीड मॅनुअल युनिटद्वारे जबरदस्त पॉवर देते. या आलिशान कारची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे.

टाटा टीगोर (Tata Tigor CNG)

टाटाने आपली सेडान कार आता टाटा टीगोर CNG च्या स्वरुपात आणली आहे. टाटाने आपल्या या सिएनजीवर चालण्याऱ्या कारची टेस्टींग सुरू केली आहे. कंपनी लवकरच ही गाडी लॉन्च करणार आहे. कंपनीने सध्यातरी टाटा टीगोरला लॉन्च करण्याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही.

इतर बातम्या :

गूगल प्ले स्टोरवरील ‘हे’ अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ! अ‍ॅपमधून झाला यूजर्सचा डेटा लिक

रिअलमी जीटी निओ 2 भारतात ‘या’ तारखेला होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

15 कोटी वापरकर्त्यांसाठी गूगल आणणार हे नवीन वैशिष्ट्य, येथे जाणून घ्या तपशील