AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गूगल प्ले स्टोरवरील ‘हे’ अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ! अ‍ॅपमधून झाला यूजर्सचा डेटा लिक

आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण अनेक अ‍ॅप्स इन्स्टॉल करुन ठेवतो. पण google play store वर काही अ‍ॅप्स यूजर्सचा खाजगी डेटा चोरी करण्याच्या उद्देशाने तयार केले आहेत. या अ‍ॅपमध्ये यूजर्सचे नाव, ईमेल आणि इतर महिती गोळा केली जाते.

गूगल प्ले स्टोरवरील 'हे' अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ! अ‍ॅपमधून झाला यूजर्सचा डेटा लिक
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 11:34 AM
Share

मुंबई : आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण अनेक अ‍ॅप्स इन्स्टॉल करुन ठेवतो. पण google play store वर काही अ‍ॅप्स यूजर्सचा खाजगी डेटा चोरी करण्याच्या उद्देशाने तयार केले आहेत. या अ‍ॅपमध्ये यूजर्सचे नाव, ईमेल आणि इतर महिती गोळा केली जाते. या गोष्टीमुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.

गूगल प्ले स्टोरवर लाखो अ‍ॅप उपलब्ध आहेत. या अ‍ॅपमधील काही अ‍ॅप्स यूजर्सना मोफत वापरण्यासाठी मिळतात. तर काही अ‍ॅप्ससाठी यूजर्सना पैसे मोजावे लागतात. या अ‍ॅपमधून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. पण अनेक वेळा हे अ‍ॅप तुमची खाजगी माहीती देखील गोळा करत असतात. असे अ‍ॅप वापरणे तुमच्या स्मार्टफोनसाठी घातक आहे.

अ‍ॅप लीक करतोय युजर्सची माहिती

सायबरन्यूजच्या एका अहवालानुसार, फायरबेस कॉन्फिग्रेशनच्या गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध असणारे 14 अ‍ॅप्स त्यांच्या युजर्सची माहिती लीक करत आहेत. या गोष्टीचा फायदा डेवलपर्स होतो. युजर्सच्या मिळलेल्या खाजगी माहितीद्वारे डेवलपर्स अ‍ॅपमध्ये बदल करू शकतो. गूगल प्ले स्टोरवरील या अ‍ॅप्सना आता पर्यंत 140 मिलीयन लोकांनी डाऊनलोड केले आहे. अशी माहीती या अहवालातून समोर आली आहे.

अहवालात दिली 1100 अ‍ॅपबद्दलची माहीती

या अहवालाने 1100 अशा अ‍ॅपबद्दल माहीती दिली आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोरवर 55च्या कॅटेगरीमध्ये आहेत. या अ‍ॅप्सनी त्यांच्या डिफॉल्ट फायरबेस एड्रेसच्या मदतीने ओळखले जाते. या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, एड्रेसची माहीती मिळाल्यानंतर संशोधन टीमने अ‍ॅप्सचा डेटाबेस परमिशन कॉन्फिगरेशन पाहीला. आणि त्यानंतर REST API च्या मदतीने अ‍ॅप्सचा एक्सेस घेण्याचा प्रयत्न केला.

गूगलने घेतली नाही खबरदारी

या अहवालात पुढे सांगितले आहे की, अभ्यासलेल्या अ‍ॅप्सनी फायरबेसला योग्य प्रकारे कंफीगर केले नव्हते. कंफीगर न केल्यामुळे यूजर्सचा खाजगी डेटा लिक होऊ शकतो. यामध्ये यूजर्सचे नाव, ईमेल आणि इतर महिती गोळा केली जाते. गूगलने या संदर्भात कोणतीही खबरदारी घेतलेली नाही असे ही या अहवालात म्हटले आहे. अशा वेळी जर तुम्ही हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले असतील तर तुमची खाजगी माहिती लिक होऊ शकते.

तुमचा डेटा होऊ शकतो लिक

याचा अर्थ जर तुमच्याकडे युनिवर्सल टीवी रिमोट कंट्रोल आहे, ज्या अ‍ॅप्सना 100 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केले असेल तुमचा डेटा लिक होऊ शकतो. या अ‍ॅप्समध्ये फाइंड माई किड्स: चाइल्ड जीपीएस वॉच अ‍ॅप आणि फोन ट्रॅकर या अ‍ॅप्सचा समावेश आहे. त्याच प्रमाणे यामध्ये Dungeon of the Overlord अ‍ॅन्ड Remote फॉर Roku: Codematics या सारख्या अ‍ॅपचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

हे आहेत धोकादायक अ‍ॅप्स

BitFunds – Crypto Cloud Mining Bitcoin Miner – Cloud Mining Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet Crypto Holic – Bitcoin Cloud Mining Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System Bitcoin 2021 MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner Ethereum (ETH) – Pool Mining Cloud

इतर बातम्या

रिअलमी जीटी निओ 2 भारतात ‘या’ तारखेला होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

15 कोटी वापरकर्त्यांसाठी गूगल आणणार हे नवीन वैशिष्ट्य, येथे जाणून घ्या तपशील

नवीन फोन घ्यायचा विचार करताय? मग थांबा! ‘या’ तारखेला लाँच होणार गुगल पिक्सेल 6, पिक्सेल 6 प्रो

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.