सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर

| Updated on: Mar 04, 2021 | 10:19 PM

स्वीडिश कार निर्माती कंपनी व्हॉल्वोने (Volvo) आज त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार सी 40 रिचार्जचे (C40 Recharge) अनावरण केले आहे.

सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर
Follow us on

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, Volvo कंपनी त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. (Volvo C40 Recharge Fully-Electric Coupe SUV Unveiled with 420 kms range)

स्वीडिश कार निर्माती कंपनी व्हॉल्वोने (Volvo) आज त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार सी 40 रिचार्जचे (C40 Recharge) अनावरण केले आहे. यापूर्वी कंपनीने व्होल्वो एक्ससी 40 रिचार्ज (Volvo XC40 Recharge) ही इलेक्ट्रिक कार बाजारात सादर केली आहे. नवी कार XC40 रिचार्जच्या मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केली जाऊ शकते आणि या कारचे उत्पादन कंपनीच्या बेल्जियममधल्या घेंट येथील कारखान्यात 2021 च्या अखेरीस सुरू केले जाऊ शकते.

शानदार लुक

Volvo ने अलीकडेच जाहीर केले आहे की 2030 पर्यंत कंपनी पूर्णपणे इलेक्ट्रिक कार्स तयार करेल. कंपनीने म्हटलं आहे की, C40 Recharge या कारमध्ये एसयूव्हीची सर्व वैशिष्ट्ये दिली जातील. यात ग्राहकांना लोअर आणि स्लीकर डिझाईन मिळेल. कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक कारची रूफ लाईन अगदी खाली ठेवली आहे. त्याच वेळी, सर्वात मोठा फरक म्हणजे या कारच्या उंचीत केलेला बदल. या कारची उंची सी 40 रिचार्ज या कारच्या तुलनेत 3 इंचांनी कमी आहे.

C40 Recharge कारचं इंटिरियर आणि फीचर्स

Volvo C 40 रिचार्जच्या इंटिरियरबाबत बोलायचे झाल्यास, कंपनीची ही पहिली कार आहे ज्यामध्ये लेदरचा वापर केला जाणार नाही, याचाच अर्थ असा आहे की या कारमध्ये लेदर सीट दिली जाणार नाही. या कारमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित गुगलने विकसित केलेली इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, व्होल्वो सी 40 रिचार्ज ऑपरेटिंग सिस्टिम दूरस्थपणे रिमोटने अपडेट करता येईल.

40 मिनिटात 80 टक्के चार्ज होणार

या कारच्या बॅटरी आणि उर्जेबद्दल सांगायचे तर व्होल्वो सी 40 चा पॉवरट्रेन देखील एक्ससी 40 रिचार्ज प्रमाणेच आहे. या कारमध्ये प्रत्येक एक्सेलवर इलेक्ट्रिक मोटरसह ऑल-व्हील ड्राईव्ह स्कीम आहे. फास्ट चार्जिंग सिस्टमसह, यात 78 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाईल, जो 408 hp पॉवर आणि 660 Nm टॉर्क जनरेट करतो. त्याचबरोबर यात 150 किलोवॅट डीसी फास्ट चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने आपण अवघ्या 40 मिनिटात कारची बॅटरी 80 टक्के चार्ज करू शकता.

5 सेकंदात 100 किमी वेग

व्हॉल्वोच्या म्हणण्यानुसार, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 420 किमीपर्यंतची रेंज देते. त्याचबरोबर, ही कार अवघ्या पाच सेकंदात शून्यापासून ताशी 100 किलोमीटरपर्यंतचा वेग पकडू शकते आणि या कारचं टॉप स्पीड ताशी 180 किलोमीटर इतकं आहे.

इतर बातम्या

नवी Tata Tiago भारतात लाँच, कमी किंमतीत जास्त फीचर्स मिळणार

Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी

Hyundai ची नवी कार लाँचिंगसाठी सज्ज, i20 Active ला पर्याय?

(Volvo C40 Recharge Fully-Electric Coupe SUV Unveiled with 420 kms range)