नवी Tata Tiago भारतात लाँच, कमी किंमतीत जास्त फीचर्स मिळणार

Tata Motors ने गुरुवारी त्यांची एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार टियागो (Tata Tiago) ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशनसह (AMT) लॉन्च केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:33 PM, 4 Mar 2021
नवी Tata Tiago भारतात लाँच, कमी किंमतीत जास्त फीचर्स मिळणार
Tata Tiago XTA

मुंबई : टाटा मोटर्सने (Tata Motors) गुरुवारी त्यांची एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार टियागो (Tata Tiago) ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) सह लॉन्च केली आहे. या आलिशान कारची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे.. टाटा मोटर्सने नवीन XTA व्हेरियंट लॉन्च केल्यामुळे ऑटोमेकर कंपनीकडे आता टियागो लाइन-अपमध्ये चार एएमटी व्हेरियंट आहेत. (Tata Motors launches new Tiago trim XTA with automatic transmission know features and Price)

नवीन टियागो एक्सटीए व्हेरिएंट एक्सटी ट्रिमवर आधारीत आहे आणि यामध्ये यासारखे अनेक फीचर्स मिळतील. या भारतीय कार निर्मात्या कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये ट्रिपल-डिजिट ग्रोथ नोंदवली आहे, मुख्यत: टियागो हॅचबॅक, नेक्सॉन सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि अल्ट्रॉज प्रीमियम हॅचबॅक या कार्समुळेच हे शक्य झालं आहे. आतापर्यंत कंपनीने देशांतर्गत बाजारात हॅचबॅक कारच्या 3.25 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे.

टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिटच्या (PVBU) मार्केटिंग विभागाचे प्रमुख विवेक श्रीवत्स म्हणाले की, एटीएसला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने एक्सटीए व्हर्जन सादर केलं आहे. श्रीवत्स म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की हे नवीन व्हेरिएंट आम्हाला मिड-हॅच सेगमेंटमध्ये आमच्या प्रतिस्पर्ध्यांहून उत्कृष्ट सिद्ध करेल.

टाटा टियागोमध्ये काय आहे खास?

टाटा टियागो ही कार 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तेव्हापासून टाटा लाईनअपमध्ये ही कार बेस्ट परफॉर्मर ठरली आहे. कंपनीने 2020 मध्ये गुजरातमधील साणंद प्लांटमध्ये 300,000 युनिट वाहनांची निर्मिती केली केली आहे. टाटाच्या IMPACT डिझाईन फिलॉसफी अंतर्गत ही पहिली कार होती. टियागोने ग्लोबल NCap सेफ्टी टेस्टमध्ये चार-स्टार रेटिंग मिळवलं आहे. या कारच्या सेफ्टी फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला एअर बॅग्स, रियर पार्किंग असिस्ट आणि ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशनसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर फीचर्स

कारमध्ये हरमनची 7 इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, 15 इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी फीचर्सने नवं एक्सटीए व्हेरियंट सज्ज आहे. नवीन व्हेरिएंटमध्ये 1.2 लिटरचे रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड ऑटोमेटेड मॅनुअल ट्रान्समिशनसह (AMT) जोडले आहे.

इतर बातम्या

बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी बॅटरी बसवण्याला प्राधान्य, खर्च किती?

दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या ‘या’ तीन 300cc बाईक्सपैकी कोणती बाईक आहे तुमच्यासाठी बेस्ट?

निसानच्या ‘या’ कारला भारतात तुफान मागणी, विक्रीच्या बाबतीत फेब्रुवारीत नवा रेकॉर्ड

(Tata Motors launches new Tiago trim XTA with automatic transmission know features and Price)