कर्जबाजारी न होता, ऐटीत 10 लाखांची कार खरेदी करा, ‘ही’ ट्रिक जाणून घ्या

कार खरेदी करायची आहे का? कर्ज न काढता कार खरेदी करण्याचा विचार आहे का? मग या दोन्ही प्रश्नांची उत्तर आज आम्ही देणार आहोत. कार तुम्ही कर्ज न काढता खरेदी करू शकता. अशावेळी एक ट्रिक आहे, याद्वारे तुम्ही विनाकर्ज 10 लाखांची कार खरेदी करू शकता. समजून घेऊया.

कर्जबाजारी न होता, ऐटीत 10 लाखांची कार खरेदी करा, ‘ही’ ट्रिक जाणून घ्या
loan
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 25, 2025 | 2:26 PM

कार घ्यायची आहे का? कार घ्यायची पण कर्ज काढायचे नाहीये का? मग चिंता करू नका. तुम्हाला कर्ज न काढता देखील कार घेता येऊ शकते. अहो हो. तेही अगदी नवीकोरी कार घेता येणं शक्य आहे. यासाठी आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत. ती जाणून घेऊया.

कार खरेदी करणे हे प्रत्येक मध्यमवर्गाचे स्वप्न असते. अनेकदा एकतर आपल्याकडे इतके पैसे नसतात किंवा कर्ज घ्यावे लागते. कर्ज घेणं इतकं सोपं नसतं. समजा तुम्ही कर्ज घेतलं तरी ते फेडण्याचा त्रासही तुम्हाला सतावतो. अशावेळी एक ट्रिक आहे ज्याद्वारे तुम्ही विनाकर्ज 10 लाखांची कार खरेदी करू शकता. त्याचे संपूर्ण गणित आम्ही तुम्हाला समजावून सांगत आहोत.

यासाठी तुम्हाला SIP काढावी लागेल. तसेच एक ठराविक रक्कम दर महिन्यात भरावी लागेल. जाणून घेऊया.

किती रुपयांची SIP काढावी लागेल?

अन्न, वस्त्र आणि निवारा या लोकांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या गरजा आहेत. आजच्या आधुनिक युगात कार आणि इंटरनेट ही लोकांची गरज बनत चालली आहे. जवळपास रोज नवीन वाहने लाँच केली जातात. यात उत्तम फीचर्स आहेत. अशावेळी कर्जाचा बोजा पडू इच्छित नसेल तर तुम्ही SIP करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

10 हजारांची SIP जमा करा

10 लाखांच्या कारसाठी तुम्हाला दरमहा 10 हजार रुपये मासिक SIP जमा करावी लागते. म्हणजे दर महिन्याला 10 हजार रुपये याप्रमाणे तुम्ही गणित केले तर अवघ्या 6 वर्षात तुम्ही 10 लाखांहून अधिक रुपये जमा कराल. ही रक्कम आणखी वाढू शकते. मात्र, SIP च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास निश्चित परतावा मिळत नाही.

तुम्ही मागील ट्रेंड लक्षात घेऊन गुंतवणूक केली तर दर महिन्याला SIP मध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास ही निव्वळ गुंतवणुकीची रक्कम 7,20,000 होईल. आता त्याच्या एकूण परताव्याबद्दल बोलूया. सर्वात कमी परतावा समजल्या जाणाऱ्या 12 टक्के रकमेचा विचार केल्यास एकूण रक्कम व्याजापोटी 3 लाख 37 हजार 570 होईल. हे गणित 6 वर्षांसाठी लागू केल्यास ही रक्कम 10 लाख 57 हजार 570 रुपये होईल.

तुम्ही 12,500 रुपयांची SIP सुरू केली तर अवघ्या 5 वर्षात 10,31,080 रुपये जमा होतील. अशावेळी त्याशिवाय तुम्हाला तुमची आवडती कार मिळू शकते. हा तुमच्यासाठी सर्वात चांगला सौदा ठरू शकतो.