AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाकाच्या रिम्समध्ये का असतात छिद्र? 1% लोकांनाच ठाऊक खरं उत्तर

Wheel Rims Holes: कारच्या चाकाच्या रिम्समध्ये छिद्र असतात. ते दिसतात. पण रिम्समध्ये छिद्र का असतात? हे 99 टक्के लोकांना माहिती नाही. एक टक्के लोक जे ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करतात. मॅकेनिक आहेत, त्यांनाच त्याचे उत्तर ठाऊक आहे.

चाकाच्या रिम्समध्ये का असतात छिद्र? 1% लोकांनाच ठाऊक खरं उत्तर
चाकाच्या रिम्समध्ये का असतात छिद्र?
| Updated on: Sep 24, 2026 | 2:41 PM
Share

कारच्या चाकांमधील रिम्समध्ये छोटे छोटे छिद्र दिसतात. पण हे छिद्र का असतात? त्यांचे काम काय? याची माहिती 99 टक्के लोकांना माहिती नाही. एक टक्के लोक जे ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांना त्यांचं खरं उत्तर ठाऊक असेल. अनेकांना वाटते हे छिद्र डिझाईन असतील अथवा दिखाव्यासाठी असतील. पण यामागील कारण काही वेगळंच आहे. हे छिद्र असणं आवश्यक आहे. त्यामागे एक खास गणित आहे. यामागे अभियांत्रिकी आणि सुरक्षिततेशी संबंधित अनेक महत्त्वाची कारणं आहेत.

1. वजन कमी करणे

रिम्समध्ये छिद्र असण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे चाकाचं वजन कमी करणे हे असते. व्हील रिम्स या लोखंडी असतात. कारचे वजन पेलण्यासाठी ते आवश्यक असते. या मेटल डिस्कचे वजन अधिक असते. कारचे आणि डिस्कचे वजन सांभाळण्यासाठी आणि हा भार कमी करण्यासाठी छिद्र ठेवण्यात येतात. चाकाचं वजन कमी झाल्याने कारचाही भार हलका होतो.

2. चाकाचं संतुलन ठेवण्यासाठी

चाकं रस्त्यावर धावताना कारच आणि चाकाचं संतुलन ठेवण्यासाठी रिम्सचे छिद्र उपयोगी ठरतात. जर चाकाचं वजन सर्व बाजूने योग्य नसेल तर कार एका बाजूने झुकलेली अथवा एकाच बाजूने ओढत असल्याची जाणीव होईल. वेगाने कार चालवताना कार कंपण करेल. त्यामुळे व्हील रिम्समध्ये छोटे छिद्र आवश्यक ठरतात.

3. ब्रेक होतात थंड

डिस्कच्या मागील बाजूला ब्रेक्स लागलेले असतात. ते वाहनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. जेव्हा कार थांबवण्यासाठी ब्रेक लावल्या जातो. तेव्हा ब्रेक पॅड आणि डिस्क अत्यंत गरम होतात. जर ही उष्णता बाहेर पडली नाही तर ब्रेक फेल होण्याची शक्यता असते. यामुळे उष्णता बाहेर काढण्यासाठी छिद्र अत्यंत गरजेचे असतात. हे छिद्र ब्रेक सिस्टिमपर्यंत थंड हवा पोहचवात. तर अति उष्णता बाहेर पडते. यामुळे ब्रेकिंग सिस्टिमचे तापमान नियंत्रित राहते. ब्रेक चांगल्याप्रकारे काम करतात.  त्यामुळे हे छिद्र केवळ शोसाठी नाहीत. तर त्याचा महत्त्वाचा उपयोग होतो, हे स्पष्ट होते.

Follow Us
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा