AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावत्या कारमध्येच कोब्रा! घाबरून ही चूक अजिबात करू नका, हे 5 उपाय वाचवतील जीव

Cobra, Snake Inside Car : कार चालवताना अचानक वाहनामध्येच साप दिसल्यावर जी काही परिस्थिती ओढावले, भंबेरी उडेल ते शब्दात सांगणे अवघड आहे. पण अशावेळी घाबरून या चुका अजिबात करू नका. हे 5 उपाय तुमचा जीव वाचवेल.

धावत्या कारमध्येच कोब्रा! घाबरून ही चूक अजिबात करू नका, हे 5 उपाय वाचवतील जीव
क्रोबा, कार
| Updated on: Sep 22, 2026 | 3:16 PM
Share

कारमध्ये साप घुसला तर घाबरगुंडी उडणे स्वाभाविक आहे. कार चालवताना सापाचे अचानक कारमध्ये दर्शन झाल्यावर भंबेरी उडते आणि अनेक जणांचा वाहनांवरील ताबा सुटतो. अशावेळी घाबरून चुका कराल तर हा खेळ जीवाशी येऊ शकतो. अशावेळी वाहन एका सुरक्षित ठिकाणी उभं करून, तातडीने सर्वांनी वाहना बाहेर येणं आवश्यक आहे. कारण साप हा काही हल्ला करण्यासाठी वाहनात येत नाही. त्यामुळे अगोदर स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा. अशावेळी हे पाच उपाय तुमचे जीव वाचवेल.

कारमध्ये साप घुसल्यावर काय करणार?

सर्प तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सर्वात अगोदर सापापासून एक अंतर ठेवा. जर साप कारच्या आतमध्ये दिसला तर वाहन अगोदर सुरक्षित स्थळी लावून कारच्या बाहेर पडा. कारचा दरवाजा उघडून साप बाहेर पडत असेल तर पडू द्या. अन्यथा दार लावून ठेवा. लहान मुलं, कुटुंबातील इतर सदस्यांना कारच्या बाहेर अगोदर काढा. सापाला हाताने पकडण्याचा प्रयत्न करू नका. काठीने मारण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका. सर्प तज्ज्ञाला अगोदर बोलवा.

सापाला हुसकवणे धोकादायक

जर कार, वाहनात अचानक साप दिसला. तर त्याला स्वतःहून हुसकवणे धोकादायक ठरू शकते. कारण काही साप हे धोकादायक असतात. ते हल्ला करू शकतात. त्यांना डिवचले तर ते फूत्कार सोडत दंश करण्याची भीती आहे. अशावेळी रेस्क्यू टीमला बोलावणे हिताचे ठरू शकते. कारमधून गर्दीच्या ठिकाणी सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्नही धोक्याचे ठरू शकते. तुमच्या अशा प्रयत्नाचा इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

साप कारमध्ये घुसतो का?

तज्ज्ञांच्या मते, कार, वाहनांच्या खाली, टायर्स आणि इंजिनच्या ठिकाणी अंधार असतो आणि इथं सुरक्षित वाटत असल्याने लपण्यासाठी साप या ठिकाणी लपतो. याशिवाय कारमध्ये साप, पाल अथवा बेंडूक असेल तर खाद्य खाण्यासाठीही साप कारमध्ये घुसू शकतो. अशावेळी कार जर घराबाहेर उभी असेल तर अगोदर कारची तपासणी करा आणि नंतरच प्रवासाला सुरुवात करा. म्हणजे मोठा धोका टळू शकेल.

Follow Us
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता