हिवाळ्यात तुमची कार देईल जास्त मायलेज; ड्रायव्हिंग करताना फक्त ‘या’ टिप्स करा फॉलो

हिवाळ्यात गाड्यांसाठी मायलेज बूस्टिंगचा विचार केला तर प्रत्येक कार चालकाला याची माहिती असणे गरजेचे आहे. कारण तुम्ही जर या दमदार टिप्स फॉलो केल्या तर ड्रायव्हिंग करताना मायलेज मध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.

हिवाळ्यात तुमची कार देईल जास्त मायलेज; ड्रायव्हिंग करताना फक्त या टिप्स करा फॉलो
ड्रायव्हिंग करताना फक्त 'या' टिप्स करा फॉलो
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 7:29 PM

हिवाळ्यात कार चालवली तर मायलेज कमी होते असे आपण अनेकांकडून ऐकलं असेलच. किंवा तुमच्या कडे जर कार असेल तर तुम्हाला देखील मायलेजच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल हे तुमच्या लक्षात येत असेल, ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते. मात्र मायलेज २० ते ३० टक्क्यांनी वाढवता येऊ शकते. यासाठी काही दमदार टिप्स आहेत ज्या आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. हिवाळ्यात या टिप्स फॉलो केल्यास पेट्रोल-डिझेलचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो आणि दरमहिन्याला भरपूर पैशांची बचत होऊ शकते.

1. हाय स्पीड टाळा:

थंडीच्या दिवसात तुम्ही जर कार भरधाव वेगाने चालवत असाल तर जास्त इंधन वापरले जाते. अशा वेळेस तुम्ही ताशी 60-80 किमी वेगाने कार चालवावी अशाने तुमचे इंधनाची बचत होते,आणि तुम्हाला इंधनावर अधिक खर्च करायला लागणार नाही. कारण वेगमर्यादेपेक्षा जास्त गाडी चालवल्यास तुमचे मायलेज कमी होऊ शकते आणि यामुळे कारच्या इंजिनवरील दबावही वाढू शकतो.

2. अचानक एक्सलरेशन टाळा:

अचानक एक्सेलेरेशन किंवा ब्रेक मारल्याने कारचे मायलेज कमी होण्याची शक्यता असते. हळू गाडी चालवल्यास इंजिनवरील दाब कमी होईल, त्यामुळे इंधनाचा वापरही कमी होईल. कारण कारच्या इंजिनवर जास्त दाब निर्माण झाल्यास इंधन अधिक लागते.

3. गिअर बदलण्याची योग्य वेळ:

जेव्हा रेव्ह 2000-2500 आरपीएम च्या आसपास असतात तेव्हा गिअर बदलतात. यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढते आणि इंधनाचा वापर कमी होतो.

4. टायरचे प्रेशर चेक करा:

टायरचा प्रेशर योग्य नसेल तर कारचे मायलेज कमी होऊ शकते. कारण टायरमध्ये हवा कमी असल्यास टायरचे अधिक घर्षण निर्माण करतात, ज्यामुळे इंधनाचा वापर जास्त होतो. टायरचा दाब नेहमी योग्य पातळीवर ठेवा.

5. एअर कंडिशनरचा वापर मर्यादित करा:

तुम्ही बाहेर जाताना जेव्हा कार घेऊन जाता. तेव्हा कारच्या एसीच्या अतिवापरामुळे मायलेजवर नकारात्मक परिणाम होतो. गरज नसताना किंवा एकटे ड्रायव्हिंग करत असताना एसी वापरू नका किंवा त्याचा वापर कमी करा.

6. कार मध्ये जास्त जड सामान ठेवणे टाळा:

कारमध्ये ठेवलेल्या जास्त वजनाने देखील कारच्या इंजिनवर दबाव येतो आणि इंधनाचा वापर वाढतो. कारमध्ये जास्त जड सामान ठेऊन प्रवास करू नका, विशेषत: जर ते अनावश्यक असेल तर.

Follow Us