AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची कार च करेल, तुमचे ‘उन्हा’ पासून संरक्षण … तुमच्या बजेटमध्ये, मारूती पासून होंडापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध !

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या कार खूप उपयुक्त आहेत, किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे मारुतीपासून होंडा पर्यंतच्या कार सेकंड हँड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या गाड्यांची स्थिती चांगली दिसत असली तरी, तुम्ही एकदा प्रत्यक्ष कार तपासूनच खरेदी करा.

तुमची कार च करेल, तुमचे ‘उन्हा’ पासून संरक्षण ... तुमच्या बजेटमध्ये, मारूती पासून होंडापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध !
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या कार खूप उपयुक्तImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 02, 2022 | 3:48 PM
Share

यंदा प्रचंड तापमान वाढ सुरू असून, मे महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानाने, 45 चा पारा गाठला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला उन्हापासून संरक्षणाचे (Protection from the sun) मार्ग शोधावे लागत आहेत. प्रचंड उन्हातही तुम्ही स्वत:ला किंवा तुमच्या कुटुंबाला बाईक किंवा स्कूटरने घेऊन जात असाल, तर तुम्हाला उष्माघात किंवा कडक उन्हामुळे उद्भवणाऱया समस्यांचा सामना करावा लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही सेंकड हॅण्ड कार (Second hand car) खरेदीचा पर्याय वापरू शकता. तर आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत. नवीन गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी (Price less than Rs 3 lakh) आहे. या गाड्यांचे तपशील पाहण्यासाठी तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही मोबाईलवर घरी बसून किंवा ऑफिसमध्ये राहून कारची माहिती मिळवू शकता.

3 लाखा खालील मारूती कार

जर तुम्ही 3 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर Cars24 वर मारुती ए स्टार कार उपलब्ध आहे. ही ABS सह येते आणि वन हॅण्ड कंडिशन असलेली कार आहे. या सेकंड हँड कारची किंमत 2,72,799 रुपये आहे. दिल्लीतील आरटीओमध्ये नोंदणीकृत ही कार पेट्रोलवर चालते आणि फस्र्ट ऑनर कार आहे. एवढेच नाही तर ही एक ऑटोमॅटिक कार आहे, ज्यामुळे युजर्संना बाहेरील गीअर्स बदलण्याची चिंता करावी लागणार नाही. या कारची नोंदणी ऑगस्ट 2013 मध्ये झाली होती. वॅगन आर सेकंड हँड कार सेंकड हँड कारमध्ये वॅगनआर कारचाही समावेश आहे. ही मारुती वॅगन आर 1.0LXI मॅन्युअल कार 48 हजार किलोमीटर पर्यंत अंतर पार केलेली कार आहे आणि दिल्लीमध्ये नोंदणीकृत आहे. ही पेट्रोलवर चालणारी कार 2010 ची मॉडेल असून ती सेंकड ऑनर कार आहे. त्याचा विमा मे 2023 पर्यंत वैध आहे. या कारची किंमत 2.44 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

सेकंड हँड होंडा ब्रिओ

तुम्ही होंडा कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही होंडा कार फक्त 2,50,000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही कार 2012 मॉडेल असून दिल्लीत नोंदणीकृत आहे. कार देखो नावाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ही कार केवळ 33 हजार किलोमीटर धावली आहे. यात 1198 cc चे इंजिन असून ते मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. ही कार पेट्रोल इंधनावर मॅन्युअल चालणारी आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल